शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातून अपहरण झालेले बाळ दिल्लीत सापडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:35 IST

बुलडाणा:खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आले. दरम्यान, या बाळाची विक्री करण्यासाठी अपहरण करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देव्रिकीसाठी झाले होते बाळाचे अपहरणसहा जणांना अटकन्यायालयाच्या आदेशाने आई-वडिलांच्या दिले ताब्यात!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून २७ सप्टेंबर रोजी पळविण्यात आलेल्या अर्भकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. अपहृत  बाळ दिल्लीत सुखरूप सापडल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसांतच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून न्यायालयाच्या आदेशाने बाळ आई-वडिलांना सोपविण्यात आले. दरम्यान, या बाळाची विक्री करण्यासाठी अपहरण करण्याचे आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील सुमैय्याबी आतीकखान  या महिलेचे पाच दिवसांचे बाळ २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३0 वाजता एका बुरखाधारी महिलेने पळविले. ही घटना उघडकीस येताच खामगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आरोग्य प्रशासनाच्यावतीने गंभीर दखल घेत, परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला बडतर्फ करण्यात आले होते. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा समांतर तपास खामगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. स्थानिक गुन्हे शाखेने गुन्ह्याच्या तपासात तीन वेगवेगळी पथके तयार केली. यामध्ये गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाचा सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाने शोध घेऊन औरंगाबाद येथील नवीन बायजी पुरा येथे सापळा रचून बाळ चोरीसाठी वापरलेल्या वाहनाचा चालक राजे जहागीर खान (४0), वाहन भाड्याने करून देणारा  इरफान खान बशीर खान (२८) दोघेही रा. नवीन बायजी पुरा यांना ताब्यात घेतले. दोघांचीही चौकशी केली असता राजे जहागीर खान याने २६ सप्टेंबर रोजी खामगाव येथून बाळ आणण्यासाठी इमरान खानच्या मदतीने गाडी भाड्याने घेतली होती. त्यामुळे  मोहसिन हुसेन खान उपजिल्हा सामान्य रुग्णालयासमोर भेटला. दोन महिलांनी रुग्णालयातून बाळ आणल्यानंतर ते औरंगाबाद येथे पोहोचले. दरम्यान, बाळ चोरीसाठी वापरलेल्या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती  उपरोक्त तिघांना मिळताच मुख्य आरोपी मोहसीन, त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड व तिची आई वेदिका किशोर पिल्ले हे तिघे जण तेथून फरार झाले. दरम्यान, अपहृत बालक आणि दोन महिला सुरुवातीला मुंबई आणि तेथून दिल्ली  येथे गेल्याचे समजल्यानंतर बालकाच्या शोधासाठी  सपोनि मनोज केदारे यांच्या पथकाला दिल्ली येथे तर मोहसीनच्या शोधासाठी पोउपनि दिनकर गोरे यांच्या पथकाला मुंबई येथे रवाना करण्यात आले. तथापि, मुख्य आरोपी दौंड येथून पुण्याकडे येत असल्याची माहिती मिळाल्याने दिनकर गोरे यांनी दौंड रेल्वे पोलिसांच्या संयुक्त मदतीने मुख्य आरोपी मोहसीन हुसेन खान (२१), त्याची पत्नी प्रीती दाविद गायकवाड (पिल्ले) रा. खामगाव यांना दौंड येथून ताब्यात घेतले. त्याचवेळी सपोनि मनोज केदारे व त्यांच्या पथकाने दिल्ली येथून मल्लिका बेगम पठाण हिंमत खान रा. बाजार सावंगी, जि. औरंगाबाद, फिरदोस अस्लम आसमानी रा. गल्ली नं. ९ वजिराबाद, दिल्ली यांना ताब्यात घेतले. बाळ पळविण्यासाठी वापरलेले वाहन ताब्यात घेऊन चालक राजे जहागीर खान, इरफान खान यांना  सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, खामगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

अर्भक सिल्लोडमार्गे दिल्लीलाहे अर्भक खामगाव येथून इंडिका कारने सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे नेण्यात आले. त्याचा सौदा आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे होणार होता. पण पोलीस पाठलाग करीत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपींनी त्याला औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला नेले. 

३५ लाखांचा सौदाहे दाम्पत्य कोट्यधीश असून त्यांना मूल बाळ होत नसल्याने त्यांनी प्रीती व मोहसीन यांच्याशी ३५ लाखांत एक बाळाचा सौदा केला होता. या दाम्पत्याने ७ लाख रुपये अँडव्हान्सही दिले होते.

बाळ १२ तास उपाशीखामगाव येथून पळविलेले बाळ विमानाने दिल्लीपर्यंत गेले खरे, पण या काळात त्याला साधे दुधसुद्धा आरोपींनी पाजले नाही.

घाईगडबडीत पत्र परिषद!खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपहृत बालकाचा शोध लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पत्र परिषद घेण्यात आली; मात्र एवढय़ा मोठय़ा घटनेबाबतच्या पत्र परिषदेचे आमंत्रण वृत्तपत्राच्या पत्रकारांना दिल्या गेले नाही. त्याचप्रमाणे या गुन्ह्याच्या तपासात महत्त्वाची भूमिका अदा करणार्‍या खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू.के. जाधव पत्र परिषदेला उपस्थित नव्हते.-