बुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान हाेणार आहे. मतदानाची तयारी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात काेराेनाबाधीत आणि क्वारंटाईन असलेल्या मतदारांची संख्या माेठी आहे. त्यांच्या मतदानासाठी काय व्यवस्था करावी, याविषयी प्रशासनाला निवडणूक आयाेगाच्या सूचनांची प्रतीक्षा आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या मतदानासाठी काेराेना पाॅझिटिव्ह आणि क्वारंटाईन असलेल्यांसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला हाेता.
तसेच मतदारांना पीपीई किटही पुरविण्यात आले हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांची संख्या माेठी असल्याने व्यवस्था काय, करावी,असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. दरम्यान, १५ जानेवारीला हाेणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ३२९ सक्रिय रुग्ण असून ३९७ क्वारंटाईन आहेत. मतदान केंद्रांवर काेराेनाविषयक नियमांचेही पालन करण्यात येणार आहे.