शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील  बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 11:20 IST

Buldhana District APMC Election News बाजार समिती संचालक मंडळास सहा महिन्याची मुदत वाढ दिली होती. ती डिसेंबरमध्ये संपत आहे.

  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गामुळे तथा तत्सम कारणांमुळे दोन वेळा मुदत वाढ दिलेल्या  जिल्ह्यातील १३ पैकी १२ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे. दुसऱ्यांदा सहा महिन्यासाठी राज्य शासनाने जुलै महिन्यात बाजार समिती संचालक मंडळास सहा महिन्याची मुदत वाढ दिली होती. ती डिसेंबरमध्ये संपत आहे. त्यानुषंगाने या बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या हालचाली आता होणे क्रमप्राप्त ठरत आहे.वास्तविक जानेवारी २०२० मध्ये व त्यानंतर पुन्हा जुलै २०२० मध्ये असे अनुक्रमे दोनदा सहा महिन्यांसाठी राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना मुदत वाढ दिली होती. राज्य शासनास किमान एक वर्षापर्यंत अशी मुदत वाढ देता येते. मात्र २४ डिसेबंर दरम्यान, मधल्याकाळात दिलेली मुदत संपत असल्याने येत्या काळात शेगाव बाजार समिती वगळता उर्वरित बाराही बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या हालचाली होणे क्रमप्राप्त आहे. मात्र अद्याप राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून त्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या नसल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.दुसरीकडे विधान परिषद सदस्यांसह ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींनी वेग घेतला असून जानेवारी अखेर जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकाही होत आहे. मिशन बिगीन अंतर्गत अनेक बाबींना शिथीलता मिळत असतााच शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बाजार समित्यांबाबतही आता निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने आता राज्य शासन आणि पणन संचालक काय निर्णय घेतात याकडे सध्या लक्ष लागून आहे. या बाबत जिल्हा उपनिबंधक महेंद्र देशमुख यांना विचारणा केली असता अनुषंगीक विषयान्वये अद्याप आमच्याकडे कुठल्याही सुचना आलेल्या नसल्याचे ते म्हणाले. काही बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त आहे तर काही बाजार समित्यांवर संचालक मंडळ कार्यरत आहे. जुन महिन्यात काही बाजार समित्यावर प्रशासंकांची नियुक्ती केल्यामुळे त्या विरोधात संचालक मंडळ पणन संचालकांकडे अपिलात गेले होते. त्यामुळे जैसे थे चे निर्देश देण्यात आले होते. अद्यापही यातील प्रकरणे पणन संचालकांकडे प्रलंबीत आहेत.

सात वर्षापासून रखडल्या निवडणुकाविलगीकरणाच्या प्रक्रियेमुळे मलकापूर, मोताळा या दोन बाजार समित्यांसह सिंदखेड राजा बाजार समितीची निवडणूक गेल्या सात पेक्षा अधिक वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुकाही त्वरेने घेणे गरजेचे झाले आहे. आता प्रत्यक्षात २४ डिसेंबर नंतर या संदर्भात काय निर्णय घेतल्या जातो याकडे सध्या कृषी जगताचे लक्ष लागून राहलेले आहे. मधल्या काळात निवडणुकीसंदर्भात बदललेले निर्णय, निधीची अडचण यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आधीचा निर्णय फिरविण्यात आल्याने या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र कोरोना संसर्गामुळे त्यास मुदत वाढ देण्यात आली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूक