शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून काटकसर; पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 11:23 IST

Austerity from the government : शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पूरक पोषण आहारातून तेल गायब झाले आहे. त्याऐवजी आता साखर दिली जात आहे. तेलाच्या वाढत्या भावामुळे शासनाकडून ही काटकसर करण्यात येत असली, तरी या निर्णयाबाबत जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.लहानपणापासूनच बालके सुदृढ व्हावीत व कुपोषण कमी करण्याच्या दृष्टीने शासनाच्या माध्यमातून पूरक पोषण आहार योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. कोविडमध्ये यामध्ये काही अडथळे येत असले तरीदेखील अंगणवाडी सेविका व मदतनीसांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत विविध खाद्यान्न पोहोचविले जात आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पूरक पोषक आहारातून खाद्यतेल गायब झाले आहे. त्याऐवजी साखर दिली जात आहे. तेलाच्या भावात मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलो दीडशेपेक्षा जास्त भाव आहे. याउलट साखरेचे भाव स्थिर असून, साखर ३६ रुपये प्रतिकिलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे शासनाच्यावतीने पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखरेचे वाटप करून खर्चात कपात करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. 

पूरक पोषण आहारात काय काय मिळते?

 ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना गहू २८०० ग्रॅम,   चवळी १५०० ग्रॅम  मसूर १५०० ग्रॅम याव्यतिरिक्त इतर गटातील लाभार्थ्यांना चणा, हळद, मीठ, मिरची पावडर आदींचे वितरण केले जाते.

 

प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळेल याकरिता आमचा प्रयल असतो. याकरिता अंगणवाडी सेविका व मदतनीस हे काम पाहतात. कोविड काळात आम्ही लाभार्थ्याला घरपोच सुविधा कशी देता येईल याकडे लक्ष देत असतो. पोषक आहार योजनेची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.-अरविंद रामरामे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. बुलडाणा

कोविड काळात अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे शासनाने तेल देणे सुरूच ठेवणे गरजेचे आहे. तेलासह साखर दिल्यास कोविड काळात गरीब, गरजूंना त्याचा लाभ होईल. -मनिषा ठाकरे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना