शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:53 IST

लोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसरपंचपद विकल्या गेले ४ लाख २१ हजारात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्रयत्न केला.लोकशाही मार्गाने होणाºया निवडणुकीमध्ये वेगळेच रूप धारण केले असल्याचे नुकतेच उघड झाले आहे. याबाबत आचारसंहीताचा भंग केल्याप्रकरणी लहुशक्ती संग्राम परिषद महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर सरपंच पदाचा लिलाव करणाºयांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत व ३३९ ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणुक सुरू आहे. लोणार तालुक्यातील मोहोतखेड, निजामपुर, मातरखेड या तीन गाव मिळून एक  गटग्रामपंचायत आहे. सर्वात जास्त मतदान हे मोहोतखेड येथे असल्यामुळे या गावामध्ये सरपंच पदाचा जाहीर लिलाव झाल्याची घटना समोर आली आहे. या गावातील नेते मंडळीनी खुलेआम चावडीवरील लाउडस्पीकरवर सरपंच पदाचा लिलाव असल्याचे सांगुन लोकांना चावडीवर बोलाविले व सरपंच पदाचा लिलाव करुन लोकशाहीचे वाभाडे काढले. यामध्ये सर्वात अधिक बोली ४ लाख २१ हजार रुपये ठरली. मात्र मोहोतखेड या गावातील नेत्यांनी ईतर गावातील नागरिकांना विश्वासात घेतले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी मतदान जास्त असल्यामुळे एकतर्फी निर्णय घेतला व त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज सादर केले. मात्र याबाबतची माहीती निजामपुर व मातरखेड येथील नागरिकांना लागताच त्यांनी याबाबत लहुशक्ती संग्राम परिषदेचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर समाधान साठे यांनी नामनिर्देशन छाणनीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदन देउन सदर प्रक्रिया रद्द करून आचारंसहीतेचा भंग केल्याप्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने होणाºया निवडणुका दडपशाही मार्गाने होत आहे. त्यामुळे जाहीर लिलाव करून अवैधरित्या सरपंच पदाचा उमेदवार ठरविणाºयांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.