शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:28 IST

Mahavikas Aghadi News महाविकास आघाडी एकत्र येते की या निवडणुका स्वतंत्रपणे सर्व पक्ष लढतात, याबाबत सध्या उत्सुकता आहे. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील राजकारण सध्या तापलेले आहे. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

बुलडाणा :  जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र येते की या निवडणुका स्वतंत्रपणे सर्व पक्ष लढतात, याबाबत सध्या उत्सुकता आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरची महत्त्वाची निवडणूक असून, ही निवडणूक राजकीय पक्ष त्यांच्या चिन्हावर लढत नाहीत; मात्र ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडी प्रसंगी एकत्रित लढण्यासंदर्भात विधीमंडळ अधिवेशन झाल्यानंतर निर्णय घेऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांकडून अद्याप त्यासंदर्भातील सूतोवाच करण्यात आलेले नाही; मात्र जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात असा निर्णय होऊ शकतो; परंतु ही बाब वरिष्ठ स्तरावरूनच ठरेल असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींपेकी मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये जिल्ह्यात निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागातील राजकारण सध्या तापलेले आहे. १५ डिसेंबर रोजी निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

स्थानिक गटातटांचे राजकारणमहाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता कमी असून, गावपातळीवरील गटातटाचे राजकारण या निवडणुकीत प्रभावी असते. त्यामुळे हे पक्ष शक्यतो ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्रित येण्याची शक्यता कमी आहे; मात्र परस्पर सहकार्य त्यांच्याकडून होऊ शकते.

ठरावीक पक्षांचा ग्रा. प. मध्ये दबदबा नाहीग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाही. त्यामुळे ठरावीक पक्षांचा ग्रामपंचायतीमध्ये दबदबा आहे, असे म्हणता येणार नाही. ग्रामपातळीवरील राजकारण यात महत्त्वाचे असते. त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर या निवडणुका होतील. ठरावीक पक्षांचे प्रभुत्व किंवा दबदबा ग्रामपंचायतीमध्ये फारसा दिसून येत नाही.

मोठ्या ग्रामपंचायतीत प्रयोगाची शक्यताजिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत मात्र प्रत्यक्ष विधीमंडळ अधिवेशनानंतर पक्षीय पातळीवर काय सूचना येतात यावर गोष्टी अवलंबून आहेत. प्रसंगी येत्या दोन ते तीन दिवसात अशी बैठक होऊ शकते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक