शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

मंडळ अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 08:54 IST

गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकार्‍यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजता घडली.

जलंब: गौण खनिज वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मंडळ अधिकार्‍यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री 12.30 वाजता घडली. या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून, टिप्पर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव झाला नसतानाही नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी गौण खनिजाची चोरी होत आहे. त्यामुळे शेगाव तहसीलदारांनी रात्रीच्या वेळी पथके नेमून गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी व तलाठ्यावर सोपवली आहे.गुरुवारी रात्री माटरगावचे मंडलाधिकारी संजय बापुराव देशमुख हे ड्युटीवर असताना त्यांना एक टिप्पर गौण खनिज घेऊन जाताना आढळून आले, त्यामुळे त्यांनी पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित टिप्पर चालकाने तहसीलच्या गाडीचा अपघात घडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तहसीलच्या वाहन चालक संतोष सातभाकरे यांनी समयसूचकता साधत गाडी बाजूला घेतली, यामुळे अपघात होण्यापासून टळला. याप्रकरणी संजय देशमुख यांनी जलंब पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. महिनाभरातील चौथी घटनागौण खनिज रोखण्यासाठी ड्युटीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घेऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना महिनाभरातील चौथी घटना आहे, यापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनला व जिल्हा प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत.