शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख १० हजार शेतक-यांचे अर्ज भरणे बाकीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून सवलतीच्या दराने पीक कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते; परंतु गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. शेतकºयांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात नुकसान झाल्याने बहुतांश शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बँकेचे थकबाकीदार राहिले. शेतकरी बँक भरू शकले नाही. त्यामुळे शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध नियमांवर बोट ठेवून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनेक शेतकरी हे अर्ज भरू शकत नाहीत. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्याची पक्रिया कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या तीन एजन्सीमार्फत सुरू आहे. आपले सरकार, महा ई-सेवा केंद्र व संगाम केंद्रावर सदर अर्ज भरण्यात येत आहेत; परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यात विविध अडचणी येत असल्याने अनेक शेतकºयांना दररोज अर्ज भरण्यासाठी संबंधित केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात ३ लाख ४९ हजार शेतकरी पात्र असून, आतापर्यंत केवळ ४८ हजार ६६४ शेतकºयांनीच कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. आॅनलाइन अर्जाच्या या किचकट प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्जमाफी अर्जातील त्रुटी शिथिल करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाºयांसमोर निवेदनाचा खच वाढत आहे.