शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत १८ हजार अपंगांना मदत

By admin | Updated: March 18, 2015 01:48 IST

अपंग सहायता दिन; बुलडाणा जिल्ह्यात अपंगांची संख्या १ लाख १८ हजार ७२३.

बुलडाणा : अपंगत्वाचं जीणं जगणार्‍यांना समाजाच्या सहानुभूतीपेक्षाही विश्‍वास हवा अस तो. त्यांचे हक्क, अधिकार आणि सेवा-सुविधा याबाबत शासनस्तरावर होणार्‍या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. विविध शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड, बँका येथे नेहमीच हेळसांडपणाची वागणूक दिली जाते. आता प्रशासनाच्यावतीनेही अपंगांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षात केवळ १८ हजार अपंग बांधवांना विविध माध्यमातून मदत देण्यात आली आहे.जिल्ह्यात गत ५ वर्षांंत नोंदविण्यात आलेली अपंगांची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे; मात्र आजपर्यंंत केवळ १८ हजार ९३४ अपंग बांधवांनाच विविध शासकीय सवलतीचा लाभ मिळत आहे. २0१३ मध्ये ११९१ अपंग आणि २0१४ मध्ये १७0७ अपंग विविध सवलतीसाठी प्राप्त ठरले. अपंगाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय सवलती लाटणार्‍यांची संख्या मोठी आहे; मात्र खरे अपंग मात्र अद्यापही या अपंगाना शासकीय योजना व सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.युथ वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अ पंग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने येथे अपंगाची तपासणी करून त्यांना अपंग असल्याचे निश्‍चित करून त्यांना अपंगाचे प्रमाणपत्र देण्यात येते. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे अपंगाना तपासणी न करताच परत जावे लागते. शिवाय बर्‍याच वेळी आज नोंदणी झाल्यानंतर अपंगाला कार्ड देण्यासाठी दोन वा तीन महिन्यानंतरची तारीख दिली जाते. यामुळे बर्‍याच अपंग बांधवांना प्रमाणपत्र मिळत नाही. परिणामी त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी वेळोवेळी शासकीय रुग्णालयात चकरा माराव्या लागतात.