शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात शिधापत्रिकांची चाचपणी!

By admin | Updated: July 2, 2016 01:23 IST

डुप्लिकेट कार्डाची तांत्रिक अडचण : ऑनलाइन दुरुस्ती सुविधा नाही!

नीलेश शहाकार / बुलडाणा प्रत्येक कुटुंबांना संगणकीकृत शिधापत्रिका देताना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत जोडणी करण्याचे काम सुरू आहे; मात्र या प्रक्रियेत डुप्लिकेट शिधापत्रिका तयार होण्याची तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. तांत्रिक अडचण सोडवून त्याचा सांख्यिकी अहवाल चाचपणी व ऑनलाइन फिडिंगसाठी मंत्रालयातील पुरवठा विभागाकडे जिल्ह्यातून पाठविला जात आहे.संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावे व फोटोसह तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकासह धान्य व गॅस सबसिडी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील ४ लाख ७२ हजार ४४४ शिधापत्रिकेसोबत आधारकार्ड लिंकिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे; मात्र प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे बर्‍याच वेळा एका व्यक्तीच्या नावाने दोन किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावे डुप्लिकेट शिधापत्रिका तयार होण्याचे प्रकार घडतात. यामुळे शिधापत्रिका रद्द होण्याची किंवा लाभार्थी कुटुंब लाभापासून वंचित राहण्याची भीती असते.अश्यावेळी तेराही तालुक्यातील तहसीलदार त्यांच्याकडील शिधापत्रिकेचा गोषवारा तपासून तशी दुरुस्ती प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांना कळविते. त्यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयात दुरुस्ती अहवाल प्राप्त होतो; मात्र ही कागदोपत्री दुरुस्ती होत असून, ऑनलाइन दुरुस्ती सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे सर्व सदर अहवाल चाचपणीसाठी मंत्रालयाकडे पाठविला जात आहे.आठवड्याला जातात शेकडो फाइलजिल्हा पुरवठा विभागाकडे प्रत्येक तहसील कार्यालयाकडून तालुका व गावनिहाय ऑनलाइन व कागदोपत्री फाईल प्राप्त होतात. या फाईल तपासून पुरवठा कार्यालयात दुरुस्ती केली जाते; मात्र ऑनलाइन दुरुस्ती करण्याची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे आठवड्याभरात शेकडो फाइल ऑनलाइन दुरुस्ती व फिडिंगसाठी मंत्रालयाकडे पुरवठा विभागाकडे पाठविल्या जात आहे.बनावट शिधापत्रिकांवर उपाययोजना गत वर्षी जिल्ह्यातील बर्‍याच तालुक्यात बनावट व बोगस शिधापत्रिक पुरवठा विभागाला आढळून आल्या होत्या. यात बरेच सधन कुटूंबांकडे पिवळ्या व केशरी शिधापत्रिका आढळून आल्या होत्या.या प्रकारावर उपाययोजना म्हणून ही ऑनलाईन दुरुस्ती प्रक्रिया मंत्रालयाकडून केली जात असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून मिळाली.