शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द

By अनिल गवई | Updated: August 12, 2022 20:26 IST

खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

- अनिल गवई खामगाव -  खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या अभियानातंर्गत घरोघरी लावण्यासाठी वरिष्ठ स्तरावर मागणी नोंदविण्यात आली. अमरावती विभागाने १२ लाख ध्वजांची मागणी केली. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याने अडीच लक्ष ध्वज मागविले. उपलब्धतेनुसार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रशासकीय स्तरावरून ध्वज उपलब्ध करून देण्यात आले. खामगाव नगर पालिकेला सुरूवातीला पाच हजार ९०० ध्वज प्राप्त झाले. त्यानंतर एक हजार ध्वज प्राप्त झाले. सुरूवातीच्या ध्वजापैकी तब्बल पाच हजारावर तर नंतर प्राप्त झालेल्या एक हजार ध्वजांपैकी २०० ध्वज सदोष निघाले. त्यामुळे या ध्वजांची विक्री पालिकेने थांबविली आहे. त्याचवेळी नांदुरा, मलकापूर, शेगाव, जळगाव येथेही सदोष ध्वजाचा पुरवठा झाला असून, जिल्ह्यात ६८ हजारांपेक्षा अधिक सदोष ध्वज प्राप्त झाल्याचे समजते.

सदोष ध्वज काढले बाजूला..कापड उसवलेले, आयातकार नसलेले, तसेच ध्वजाच्या रंगावर डाग असलेले सदोष ध्वज बाजूला काढण्यात आले आहेत.  दरम्यान, खामगाव पंचायत समितीत आलेले सदोष ध्वज यापूर्वीच बदलविण्यात आले आहेत.

सदोष ध्वजांची संख्या मोठीस्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त असलेल्या ध्वजांपैकी ३४ टक्के ध्वज सदोष असल्यामुळे प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. त्याचवेळी ध्वज वेळीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.

 सदोष असलेल्या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष ध्वज परत पाठविण्यात येतील. सदोष ध्वज परत देण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून निर्देश प्राप्त झाले आहेत.-मनोहर अकोटकरमुख्याधिकारी, नगर परिषद, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणा