शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अरुण दातेंचे झब्बे अन् बुलडाणा यांचे अनोखे नाते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:15 IST

भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह बुलडाणेकरांसाठीही धक्का देणारी घटना ठरली आणि पुन्हा ५० झब्ब्यांचा किस्सा बुलडाणेकरांना स्मरला.

बुलडाणा : भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह बुलडाणेकरांसाठीही धक्का देणारी घटना ठरली आणि पुन्हा ५० झब्ब्यांचा किस्सा बुलडाणेकरांना स्मरला.तब्बल २९ वर्षांच्या अनोख्या मैत्रीचा हा किस्सा आहे. या मैत्रीमुळे बुलडाणा आणि अरुण दातेंचे एक अजोड असे नाते बनले होते. अरुण दातेंची ही मैत्री होती बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी. या दोघांची नावे जेव्हा समोर येतात, तेव्हा ५० झब्ब्यांची गोष्ट आवर्जून बुलडाण्यासह संगीत रसिकांना आठवते. अरुण दातेंच्या जाण्याचे बुलडाणेकरांच्या डोळ्यासमोरही २९ वर्षांच्या या एका कौटुंबिक संबंधांचा चित्रपट झर्रकन डोळ्यासमोरून गेला. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्याची तशी कबुलीच दिली.अरुण दातेंच्या ज्या मैफलीला हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असतील, त्या मैफलीसाठी अरुण दातेंनी परिधान केलेला अंगातील झब्बा हा खिशातील पैशांसह हर्षवर्धन सपकाळांना भेट दिल्या जात होता.प्रत्येक मैफलीत अरुण दातेंनी हा किस्सा उपस्थित रसिकांनासुद्धा सांगितलेला आहे. आजपर्यंत कमी-अधिक ५० झब्बे अरुण दातेंकडून हर्षवर्धन सपकाळांना भेट मिळालेले आहेत.अरुण दाते यांनी तब्बल सहा दशके एकहाती भावगीताचे वैभव प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत व मनापर्यंत पोहोचवत अभिजात मराठी माय-माउलीची केलेली सेवा अतुलनीय असून, भावविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची भावना अरुण दातेंच्या निधनाच्या पृष्ठभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.१९९० मध्ये सुरू झब्ब्यांचा किस्साबुलडाणा शहरात १९९० मध्ये जय मातृभूमी क्रीडा मंडळाने अरुण दातेंच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीमध्ये ‘पंखा’ म्हणून ओळख असलेल्या जय मातृभूमीचे खेळाडू आणि आताचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यावेळी अरुण दातेंना आॅटोग्राफ न मागता त्यांचा शर्ट मागितला होता आणि अरुण दातेंनी तो मोठ्या मनाने त्यांना दिला. तेव्हापासून ते अगदी गेल्या वर्षाअखेरीस कुरियरने अरुण दातेंनी हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचे तीन झब्बे पाठवले होते.

टॅग्स :arun datearun datebuldhanaबुलडाणाnewsबातम्या