शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सेना मतदान करणार नाही

By admin | Updated: July 14, 2014 22:50 IST

बुलडाणा पालिका : उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश

बुलडाणा : नगर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेकडे दमदार असे संख्याबळ असतानाही शिवसेने उमेदवार दिला नाही. सेनेच्या या कृतीवर शिवसेना शहरप्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणी आमदार विजयराज शिंदे यांनी राजकीय तडजोड केली असा जाहिर आरोप त्यांनी केला होता. या पृष्ठभूमीवर खासदार प्रतापराव जाधव व जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे यांनी सेनेचे नगरसेवक मतदान प्रक्रीयेत सहभागी होणार नाही असे पत्रक शिवसेना कार्याध्यक्षांच्या आदेशाने काढल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. बुलडाणा पालीकेत २७ सदस्य असुन शिवसेनेचे ९ , भाजपाचा १, अपक्ष २, काँग्रेस ४ असे संख्याबळ असुन राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांपैकी २ मनसेत गेले आहेत. गेल्यावेळी शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा देत सत्ता हस्तगत करून उपाध्यक्षपद स्विकारले होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्व अभ्रद युती मोडून काढल्याने शिवसेनेला सत्ता स्थापनेचा नवा पर्याय सहज शक्य होता. सेना,भाजपा, अपक्ष अशी मोट बांधुन सत्तेचा प्रयत्न करता आला असता मात्र आ.शिंदे यांनी उमेदवारी अर्जच दाखल करण्याचे टाळले. आ.शिंदे यांची ही खेळी शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आणणारी ठरली असुन सेनेची राष्ट्रवादीसोबत गुप्त तडजोड झाली का? अशी शंका थेट शहरप्रमुख बेंडवाल यांनीच उपस्थित केल्याने त्याची दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सचिव अनिल देसाई यांनी घेतली आहे. या नुसार खासदार जाधव व जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी पत्रक काढून सेनेचे ९ नगरसेवक मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत असे आदेश काढले असुन कायदेशीर करावाईचाही इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी झाली असुन तुकाराम अंभारे पाटील व मो.सज्जाद हे दोघेही निवडणुकीत कायम आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेचा निर्णय हा पालीकेतील राजकारणाला नवा रंग देणारा ठरला आहे.

** खामगाव : 'शविआ'नेही कसली कंबर

खामगाव: नगर पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शहर विकास आघाडीनेही शर्थीचे प्रयत्न चालविले असुन राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव डवरे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहर विकास आघाडीच्या अशा प्रयत्नांमुळे खामगाव नगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. शहर विकास आघाडीत असलेल्या वैभव डवरे यांनी पक्षाच्या व्हीप नुसार काँग्रेसचा हात पकडला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग जवळपास निश्‍चित मानला जात आहे. दरम्यान, नगर पालिकेत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप या पक्षाच्या नगरसेवकांनी स्वत:हून नगर पालिकेत सत्ता स्थापन करताना जिल्हाधिकार्‍यांकडे शहर विकास आघाडी नावाने पक्षविरहित आघाडी म्हणून रितसर नोंदणीही केली. त्यामुळे उपरोक्त पक्षाच्या नगरसेवकांची आघाडी हा एक स्वतंत्र पक्ष म्हणून नगर पालिकेत अस्तित्वात आला. त्यामुळे या आघाडीच्या व्हीपलाही राजकीय पक्षाच्या एवढेच महत्व असल्याचे शहर विकास आघाडीचे नेते सांगतात.मात्र आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप देवून काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान करायला सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीेचे डवरे हे राष्ट्रवादीचा व्हीप स्विकारून काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान करतील की आघाडी सोबत राहतील याबाबत शहरात राजकीय चर्चेला उत आला आहे.