शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी पद्घतीवर होणार शंभर कामगारांची नियुक्ती!

By admin | Updated: July 20, 2014 23:41 IST

साफ सफाई आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शंभरपेक्षा जास्त सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे.

खामगाव: शहरातील साफ सफाई आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शंभरपेक्षा जास्त सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार उद्या सोमवारी सकाळी साफसफाईसाठी सफाई कामगारांना बोलाविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठाही टप्प्या-टप्प्याने सुरळीत करण्यात येणार आहे. पालिकेतील प्रशासकीय कर्मचार्‍यांसह पाणी पुरवठा, अग्निशमन, दवाखाना आणि स्वच्छता विभागासारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पालिका कर्मचार्‍यांच्या संपामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा प्रभावित होणार नाही, याची खबरदारी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात आहे. शहरातील स्वच्छतेची कामे प्रभावित होवू नये म्हणून कंत्राटी पद्धतीने सुमारे शंभरावर कर्मचार्‍यांना तात्पुरती नियुक्ती देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठय़ासाठी शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरूळीत करण्यासाठी शिकाऊ कर्मचारी धडपड करीत असल्याचे चित्र आज शहराच्या विविध भागात पहायला मिळाले. पाणी पुरवठय़ासाठी टप्प्या टप्प्याने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी १५ जुलै पासून पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यानंतर १८ जुलै पासून अतिआवश्यक सेवेतील आणि सोमवार २१ जुलैपासून सफाई कामगार संपावर जाणार आहेत. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्‍यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावा, नगर पालिका कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्‍यांना व अपंग कर्मचार्‍यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. सुमारे चारशेच्यावर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.