बुलडाणा: ह्यशिक्षण सेवकह्ण म्हणून नियुक्ती देण्याऐवजी ह्यशिक्षकह्ण म्हणून नियुक्त करण्याचा प्रताप जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला. दरम्यान, १७ फेब्रुवारी २00४ रोजी नियुक्ती मिळालेल्या ह्यत्याह्ण दोन शिक्षकांनी पूर्ण पगार देण्यात यावा अशी जिल्हा परिषदेकडे केली आहे. विनाअनुदान तत्त्वावरील शाळा सुरू करताना शासनाने आखलेल्या धोरणानुसार खासगी आस्थापनेच्या शाळांमध्ये थेट शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाते; मात्र, जिल्हा परिषद आस्थापना विभागामध्ये ही नियुक्ती शिक्षणसेवक म्हणूनच होते. तथापि, १७ फेब्रुवारी २00४ रोजी रविकुमार शेळके व दत्तात्रय वांजोळ यांना मंगरुळ नवघरे येथील जि.प. कनिष्ठ महाविद्यालयात नियुक्ती देताना तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी शिक्षक म्हणून नियुक्ती देऊन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी असणारी वेतनङ्म्रेणीही निश्चित केली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांना मात्र शिक्षण सेवकाचे वेतन देण्यात आले. नियुक्तीपासूनच त्या दोन्ही शिक्षकांनी पूर्ण पगार देण्यात यावा, अशी जिल्हा परिषदेकडे वारंवार मागणी केलीे. मात्र, त्यांच्या या मागणीकडे संबंधितांना दुर्लक्ष केले. जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षणसेवक नियुक्तीबाबतच्या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे आता प्रशासनच अडचणीत आले आहे. शिक्षण विभागाच्या नियुक्तीच्या या घोळामुळे प्रशासन अडचणीत सापडले असून ऑगस्ट महिन्यात यासंदर्भात शिक्षण संचालकांशी संपर्क साधून मार्गदर्शन मागितले आहे.
थेट शिक्षक म्हणून दोघांना दिली नियुक्ती!
By admin | Updated: December 17, 2015 02:37 IST