बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, आणखी एका ६३ वर्षीय महिला रुग्णाचा साेमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तसेच आणखी ५४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ३९७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७७ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४५१ अहवाल साेमवारी प्राप्त झाले आहेत. यापैकी ३९७ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ५४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४२ व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील १२ अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मोताळा तालुक्यातील पिं. देवी येथील ११ , काबरखेड १, दे. राजा शहर ९, चिखली शहर ४, चिखली तालुका वळती १ , मेरा खु २, देऊळगाव घुबे १, ढासाळा १, खामगाव तालुका पिं. राजा १, गारडगाव १, आवार १, खामगाव शहर ४, शेगाव शहर ३, संग्रामपूर तालुका खिरोडा १, शेगाव तालुका भोनगाव १, बुलडाणा शहर ८, जळगाव जामोद शहर २, मूळ पत्ता पारध, ता. भोकरदन, जि. जालना एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान चिखलीरोड, बुलडाणा येथील ६३ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज ७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव काेविड सेंटरमधील १६ , दे. राजा १४ , सिं. राजा ५, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय ३, अपंग विद्यालय २७, शेगाव ६, मलकापूर १, चिखली ३ मेहकर येथील दाेघांचा समावेश आहे.
१५० जणांचा मृत्यू
जिल्ह्यात १२०४ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ८७ हजार ५२५ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १२ हजार ४३६ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार १७ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात २६९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.