शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

अंजली दमानियांच्या विरोधातील दुसरी तक्रारही मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 13:48 IST

खामगाव :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रार मुक्ताई नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये माधव पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. शहर पोलिसांनी देखील कायदेशीर प्रक्रीयापूर्ण करून माधव पाटील यांची तक्रार पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रार मुक्ताई नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. खामगाव शहर पोलिसांनी या संदर्भातील सर्व सोपस्कार शुक्रवारी पूर्ण केले. 

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘आप’च्या पदाधिकारी अंजली दमानिया यांनी माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना तसेच खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडविण्याच्या दृष्टीकोनातून चोपडा अर्बन को-आॅप बँक लि. चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले.  हे चेक खरे म्हणून न्यायालयात सुध्दा वापरले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी अंजली दमानिया यांनी न्यायालयाचीही फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये माधव पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनास्थळ हे मुक्ताईनगर असल्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनप्रमाणेच शुक्रवारी शहर पोलिसांनी देखील कायदेशीर प्रक्रीयापूर्ण करून माधव पाटील यांची तक्रार पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांनी दमानिया यांच्या विरोधात गुन्हा न दाखल केल्याबाबत खंत व्यक्त केली.

 

माजी मंत्री खडसेंचीही तक्रार!

माजी मंत्री एकनाथ खडसे  यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने न्यायालयाची फसवणूक करणाºया अंजली दमानिया यांच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात १३ तक्रारी दाखल आहेत. यापैकी २ तक्रारी मुक्ताईनगरकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या उपरोक्त आशयाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात  अप क्रमांक ११६/१८ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३७९, ३८०, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

 

अंजली दमानिया यांनी फसवणूक केल्याप्रकरणी माधव पाटील यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनास्थळ मुक्ताई नगर आहे. या ठिकाणी अशा आशयाच्या तक्रारींवरून तेथे दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे माधव पाटील यांची तक्रार शुक्रवारी मुक्ताईनगर येथे वर्ग करण्यात आली आहे. 

    - संतोष ताले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावanjali damaniaअंजली दमानियाEknath Khadaseएकनाथ खडसे