शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी ८३७ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 10:47 IST

CoronaVirus in Buldhana गेल्या एक वर्षाच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने संदिग्ध रुग्ण बाधीत आढळून आल्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागले.

बुलडाणा: कोरोनामुळे गेल्या ४८ तासात जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल ८३७ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने संदिग्ध रुग्ण बाधीत आढळून आल्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागले.गेल्या ४८ तासात तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९८ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १ टक्क्यावर आहे. दुसरीकडे तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णांचीही संख्या वाढली असून एकट्या बुलडाणा तालुक्यात तब्बल १२७ जण कोरोना बाधीत आढळले आहे. खामगावमध्ये ५७, शेगावमध्ये ९०, देऊळगाव राजात ५४, चिखलीत ८३, मेहकरमध्ये ३६, नांदुरा ६१, लोणार ९, मेताळा ६१, जळगाव जामोद ७७, सिंदखेड राजा ४७, संग्रामपूर ९२, लाखनवाडा दोन,  खासगी रुग्णालयातील १२ बाधित मिळून ८३७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी ते नेमके कोठील आहेत, हे स्पष्ट होवू शकलेले नाही.दरम्यान जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २० हजार ९२५ झाली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट २३.४१ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या जिल्ह्यात ८६.४८ टक्के आहे.

बत्ती गुल झाल्याने वाढली संख्याकोवीड समर्पीत रुग्णालयात असलेल्या प्रयोगशाळेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने गुरूवारी फक्त रॅपीड टेस्टचे अहवाल देण्यात आले होते. नंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दोन दिवसांचे अहवाल ६ मार्च रोजी एकत्र देण्यात आल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने व त्यातच ४८ तासात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना संक्रमण जिल्हयात वाढल्याचे सार्वत्रिक चित्र तुर्तास तरी दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला