बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी आणखी ६२ जणांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ५७२ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले असून ३१ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६३४ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५७२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ५७ व रॅपिड अँटिजेन टेस्टमधील ५ अहवालांचा समावेश आहे.
पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील ५, बुलडाणा तालुका सागवान ५, दुधा १, चिखली शहर ९, चिखली तालुका सावंगी दळवी १, दे. राजा शहरातील ४, मोताळा शहरातील ३, मोताळा तालुका बोराखेडी १, मेहकर तालुका बदनापूर १, शेगाव शहरातील ८, दे. राजा तालुका : सिनगाव जहागीर ३, खामगाव शहरातील १७, मलकापूर शहरातील १, जळगाव जामोद शहरातील १, संग्रामपूर तालुक्यातील अकोली १, गोद्री १, मूळ पत्ता पिंपळी गुरव पुणे येथील १ संशयित पाॅझिटिव्ह आला आहे. काेराेनावर मात केल्याने खामगाव येथील १३, बुलडाणा अपंग विद्यालय ३, स्त्री रुग्णालय २, मेहकर २, मोताळा ६, शेगाव ११, जळगाव जामोद येथील एकास रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत ९६ हजार ७०६ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच ६३१ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार २६७ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १२ हजार ७५८ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३५१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.