बुलडाणा : विदर्भ साहित्य संघ, शाखा बुलडाणाची नवीन कार्यकारिणी बुधवारला निवडण्यात आली असून शाखाध्यक्ष पदी जिजामाता महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अनंत सिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य नरेंद्र लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा कार्यकारिणीच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. विदर्भ साहित्य संघ, बुलडाणा शाखेच्या सचिव पदी कादंबरीकार त था बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर यांची निवड करण्यात आली. सहसचिव पदी प्रा. संगिता पवार (काळणे) यांची तर कोषाध्यक्षपदी सुप्रसिद्ध नाट्य कलावंत अनिल अंजनकर यांची निवड करण्यात आली आहे. बुलडाणा शाखेच्या कार्यक्रम प्रमुख पदी नरेंद्र लांजेवार यांची निवड करण्यात आली आहे. बुलडाणा तालुका विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून प्रा. सुनिल देशमुख, प्रा. डॉ. सुहास उगले, रविकिरण टाकळकर, डॉ. माधवी जवरे इत्यादींची निवड करण्यात आली आहे. येत्या कालावधीत लवकरच नवोदीत लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा तसेच नियमित वाड्मयीन उ पक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचा मनोदय प्रा. डॉ. अनंत सिरसाठ यांनी यावेळी व्यक्त केला.
विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी जाहीर
By admin | Updated: July 9, 2016 00:12 IST