शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंजनखेड्याच्या उपसरपंचाची गळा कापून हत्या

By admin | Updated: May 26, 2017 20:26 IST

सोन्याच्या अंगठ्या व साखळी लंपास : हत्येमागचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - तालुक्यातील अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन भागवत पायघन (वय ५५) यांची अज्ञात इसमांनी तिक्ष्ण हत्याराने गळा कापून हत्या केली. ही घटना हिंगोली मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपा समोरील खासगी गोडाऊन समोर २६ मे रोजी सकाळी ११ चे सुमारास घडली. अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे कामानिमित्त घोडबाभूळ शिवारात असलेल्या शेताकडे सकाळी फेरफटका मारायला गेले होते. शेताकडे जात असताना अज्ञात इसमांनी  तिष्ण हत्याराने गळा चिरून त्यांची हत्या केली. पायघन यांच्या बोटामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या, साखळी असा एकुण अंदाजे २ लाखाचा ऐवजही लंपास केला. या घटनेची माहिती पोलीस प्रशानाला मिळाल्यानंतर घटनास्थळावर अपर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार सुनिल अंबुलकर यांच्यासह फिंगर प्रिंट तज्ञ व अकोला येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.  या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हत्येमागचे कारण अस्पष्ट पायघन यांची हत्या केल्या नंतर हत्यारांनी पायघन यांच्या बोटातील अंगठ्या, गळ्यातील साखळी व मोबाईल लंपास केला. त्यामुळे पायघन यांच्या हत्येमागे जबरी चोरी, राजकीय वैमनस्य किंवा ह्यअनैतीकह्ण संबंध यापैकी कोणतेही एक कारण असू शकते. चार चाकी वाहनाचा वापर पायघन यांची हत्या करण्याकरीता अज्ञात इसमांनी चार चाकी वाहनाचा वापर केल्याचे घटनास्थळावरील प्रथमदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट होत आहे. या वाहनाने एका विद्युत वाहिनीच्या खांबाला धडक दिल्याने वाहनाच्या काचा फुटून घटनास्थळावर पडल्या व खांबही चांगलाच झुकला गेला. सोने लंपास करून दिशाभुल करण्याचा हेतू ? पायघन यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने लंपास करण्यामागेही हत्यारांचा पोलीस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा हेतू असू शकतो. पायघन यांच्या हत्येमागे ह्यअनैतीकह्ण संबंधाचेही कारण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.