मोताळा (जि. बुलडाणा), दि. २१- अवैधरीत्या कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असलेल्या ५ जणांना ४३ जनावरांसह पकडण्यात आले. ही घटना २0 सप्टेंबर रोजी रात्री १0.३0 वाजेच्या सुमारास निमखेड शिवारात उघडकीस आली. जवळपास दीड लाख रुपये किमतीच्या या जनावरांमध्ये लहान-मोठय़ा ४२ गायी व एका गोर्हय़ाचा समावेश आहे. निमखेड शिवारात मंगळवारच्या रात्रीदरम्यान कत्तलीसाठी गायी नेत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. या आधारावर परिसरातील नागरिकांनी चौकशी केली असता, शेख आसीफ शेख करामत, हारून शाह रशिद शाह दोघे रा. कोथळी, शेरसिंग बदनसिंग साबळे, जितेंद्र लक्ष्मण मोरे, वसंता यशवंत गायकवाड तिघे रा. लोणघाट असे पाच जण हे निमखेड शिवारातील डोंगराच्या दिशेकडून ४२ लहान-मोठय़ा गायी व एक गोर्हा कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले.
कत्तलीसाठी नेणारी जनावरे पकडली!
By admin | Updated: September 22, 2016 01:31 IST