शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे दगावलीत, आता पुराने वेढले

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील पाच घरे वाहुन गेलीत, शेतजमीन खरडल्यात.

बळीराम वानखडे / खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावात नैसर्गिक संकटाने चांगलीच दहशत पसरविली आहे. या गावातील शेकडो जनावरे दगावल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच, आज पुन्हा गावात पावसाचा कहर झाला. पहाटे झालेल्या अतवृष्टीमुळे गावातील नदीला पूर आल्याने गावातील पाच घरे वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्‍यांची शेती खरडून गेली.जुलै महिन्याच्या अखेरीस अचानक आलेल्या अतवृष्टीमुळे या गावातील पशु पालकांची १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली होती. गावातील तानाजी शिंगाडे या एकाच शेतकर्‍यांची ६0 जनावरे दगावली होती. त्याचप्रमाणे गोपाल हटकर यांच्याही २२ जनावरांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून गावातील नागरिक कसेबसे सावरले असतानाच, आज पुन्हा अतवृष्टीने कहर केला. परिसरात झालेल्या अतवृष्टीमुळे गावातून जाणार्‍या नाल्याला पूर आला. या पुरात लक्ष्मण अशोक अडागळे, अजय अशोक अडागळे, गोपाल हरी अडागळे, सुखदेव नामदेव अडागळे, निमाबाई भगत या नागरिकांची घरे वाहून गेली. निमाबाई भगत या विधवा महिलेच्या घरी तिची डिलेव्हरी झालेली मुलगी एकटीच असताना, घराला पुराने वेढा घातला. या महिलेची कशीबशी सुटका करून गावकर्‍यांनी तिला चिमुकल्यासह ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत आसरा दिला. लक्ष्मण अडागळे यांच्या घरातील चार हजार रूपये रक्कमेसह संपूर्ण भांडीकुंडीही पुरात वाहून गेली आहे. घर वाहून गेल्याने या कुंटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. नदीला पहाटे पूर आल्याने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी मोठय़ाप्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्याचप्रमाणे गोपाल हटकर, तानाजी शिंगाडे, अशोक हटकर, पंढरी राऊत, निंबाजी शिंगाडे, महादेव खंडारे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची शेती खरडून गेली. गोपाल हटकर यांच्या रस्त्यावरील शेतातील कपाशीसोबतच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तानाजी शिंगाडे या युवा शेतकर्‍याच्या बागायती शेतातील संत्र्याची व डाळींबाची झाडे वाहून गेली आहेत. पंढरी राऊत यांच्या शेतातील नाशिक कांद्यासह दीड एकर कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.*तांत्रिक आधार नसलेली पध्दत अडचणीचीखामगाव तालुक्यातील पर्जन्यमान मोजण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बिल्डींगवर आकाशातून पडणार्‍या पाण्याची साठवणूक करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रात पाणी साचल्यानंतर बाजार समितीतील कोणताही एक कर्मचारी ते पाणी काचेच्या नळीत टाकतो. या नळीत मोजमाप केल्यानंतर पाण्याची आकडेवारी ठरविण्यात येते. पर्जन्यमापक यंत्र नसलेल्या परिसरात पाऊस झाल्यास याची नोंद इथे होत नाही. थोडक्यात या इमारतीच्या परिसरात पडणारा पाऊस म्हणजेच तालुक्यातील पावसाची सरासरी ठरविण्यात येते. त्यामुळे कोणताही तांत्रिक आधार नसलेली ही पद्धत परिसरातील नागरिकांच्या मुळावर उठली आहे. शिरसगाव देशमुख, अंत्रज, गोंधनापूर, वाघळी, गारडगाव, हिवरखेड परिसरात अतवृष्टी झाल्यानंतरही शहरात केवळ १६ मिमी पावसाची नोंद झाली होती. हीच आकडेवारी शासकीय आकडेवारी ठरत आहे.