शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अंगणवाड्यांना कच्च्या धान्याचा पुरवठाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:10 IST

अंगणवाडीत कच्चे धान्य पोहोचलेच नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीत कच्चे धान्य पोहोचलेच नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. तर काही ठिकाणी ५० दिवसांच्या किटऐवजी खुली पाकीटं वितरीत केल्या जात आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी कच्च्या धान्यांपासून वंचित असल्याचे दिसून येते.अंगणवाडी मधील ०६ महिने ते ०३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदा माता तसेच कमी वजनाची बालके आणि ११ ते १४ वर्ष वयोगटातील कुमारवयीन मुलींना लाभार्थी निहाय सीलबंद पाकीटमध्ये कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाने ३० मार्च २०१९ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. यासाठी लाभार्थी निहाय पाककृती निश्चित करून महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनला पर्यायी व्यवस्थेतंर्गत कंत्राट देण्यात आला आहे. फेडरेशनने यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मात्र, या कंत्राटदारांकडून नियमित कच्चे धान्यांचा पुरवठा केला जात नसल्याचे दिसून येते. आयुक्तांच्या ३० मार्च २०१९ च्या आदेशानुसार १५ आॅगस्ट २०१९ पर्यंत ३ वेळा म्हणजे माहे मे/जून (५० दिवस), जुलै/ आॅगस्ट (५० दिवस) आणि सप्टेंबर/ आॅक्टोंबर (५० दिवस) अशा एकुण १५० दिवसांसाठी प्रत्येक लाभार्थ्यांना, त्यांच्या गटानुसार माहे मे -२०१९ पासून आतापर्यंत ३ वेळा म्हणजेच १५० दिवसांचे कच्चे धान्य मिळणे आवश्यक होते. मात्र, खामगावसह अनेक तालुक्यात पूर्ण मालाचे वितरण झालेले नाही. तसेच वितरीत केल्या जाणाऱ्या धान्यांबाबत आदेशाची प्रत मंगळवारी खामगाव येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात मिळून आली नाही. तसेच पुरवठा करण्यासंदर्भात कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झाले नाही. तसेच माहे सप्टेंबर/ आॅक्टोबरचा पुरवठा पूर्ण झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच येत्या १-२ दिवसांत खामगाव तालुक्यातील सर्वच अंगणवाडीत माल पोहोचणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून आयुक्तांनी ठरवून दिलेल्या मालाचे प्रमाण आणि पॅकींगबाबत कमालिची गुप्तता पाळल्या जात असल्याचे दिसते.असे आहे लाभार्थी निहाय धान्य वितरण!०६ महिने ते ३ वर्ष लाभार्थी करीता ५० दिवसांसाठी १ मोठी सीलबंद पिशवी देणे आवश्यक आहे. यात गहू-२.९५० किलो, मसूरडाळ-७५० ग्राम, मुगडाळ- ६६९ ग्राम, मिरची पावडर -२०० ग्राम, हळद-२०० ग्राम, मीठ ४०० ग्राम, सोयाबीन तेल- ५०० ग्राम, चवळी-७५० ग्राम, मटकी-६५० ग्राम याप्रमाणे मोठ्या सीलबंद पिशवीमध्ये एकुण ७ किलो ५० ग्राम कच्चे धान्य देण्याची तरतूद आहे.गरोदर स्त्रीया व स्तनदा माता आणि किशोर वयीन मुलींकरीता - गहू ३.७७५ किलो, मसुरडाळ-९५० ग्राम, मूगडाळ-८२५ ग्राम, मिरची पावडर-२०० ग्राम, हळद- २०० ग्राम, मीठ ४०० ग्राम, सोयाबीन तेल- ५०० ग्राम, चवळी- १ किलो, मटकी- ८२५ ग्राम मिळणे क्रमप्राप्त आहे.

खामगाव तालुक्यातील किती अंगणवाड्यांमध्ये कच्च्या धान्यांचा पुरवठा झालेला नाही. याबाबत पर्यवेक्षकांकडून आढावा घेण्यात आलेला नाही. आढावा घेतल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.- यु.डी. देशमुखबालविकास प्रकल्प अधिकारी, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव