शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘अंगणवाडी सेविकांचे मानधन अन्य कर्मचाऱ्याप्रमाणे नियमित देणार’ - यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 11:15 IST

हेडमध्ये शुन्य बॅलन्स असतांनाही अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित करण्यात येईल. त्यासाठी महा विकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अन्य शासकीय कर्मचाºयाप्रमाणेच राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन हे नियमित स्वरुपात देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासन घेणार असल्याचे संकते राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी १० जुलै रोजी बुलडाणा येथे दिले.अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे संंबंधीत हेडमध्ये शुन्य बॅलन्स असतांनाही अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित करण्यात येईल. त्यासाठी महा विकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. यावेळी आ. राजेश एकडे, माजी आ. राहूल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, महिला व बाल विकास सभापती ज्योती पडघान यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, मध्यंतरी आशा वर्कसचे मानधन वाढविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर अंगणवाडी सेविकांचेही मानधन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.कोरोना संसर्गाच्या काळात पोषण आहार पोहोचविण्याचे आव्हान होते. मात्र ते योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात काही भागात अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. येत्या काळात त्या बांधण्यास प्राधान्य राहील, असेही त्या म्हणाल्या.जिल्हास्तरावरही महिला आयोगाचे कार्यालय उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न असून या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचारासोबतच महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत मिळले. यवतमाळप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातही कुमारी मातांचे प्रमाण आढळून आले असून त्याचे प्रमाण कमी असले तरी असे प्रकार व्हायला नको, असे त्या म्हणाल्या. बुलडाणा येथील कै. ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्याचा मुद्दा विचाराधीन असून त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न आपण करू. तसा प्रस्ताव आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आपला विभाग कटीबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात२ चांगले काम होत असून अमरावती विभागातील स्थिती पाहता येथील कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. या संसर्गाच्या काळात राजकारणाला थारा न देता कोरोना रोखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

रुलर मार्ट उभारणारवाशीम जिल्ह्याप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातही बचत गटांच्या महिलांनी उत्पादीत केलेले साहित्य व वस्तू विक्रीसाठी त्यांना एक बाजार पेठ मिळावी म्हणून बचत गटांचे रुलर मार्ट बुलडाण्यात उभारणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्यासाठी नाबार्ड कडून मदत घेणार असून यातून या बचत गटांना त्यांचे व्यवसाय करणे सुलभ जाईल.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरbuldhanaबुलडाणा