शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Updated: July 11, 2017 00:02 IST

सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर १० जुलै रोजी निदर्शने करण्यात आली. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातून सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सभासद जिल्हा परिषद कार्यालयासमोर जमा झाल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जमलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. महिलांच्या आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, अंगणवाडी सेविका तथा जि.प.सदस्य संगीता शिनगारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील मेसरे हे आंदोलनस्थळी आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० जून २०१६ रोजी शासन व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करून मानधनवाढ समिती स्थापन करण्यात आली होती. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीसंदर्भात या समितीने केलेल्या शिफारशी लवकरच लागू करू, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दोनदा दिले होते; मात्र हे आश्वासन पाळल्या गेले नाही, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यासाठीच या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय निवेदनात मानधनवाढ समितीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, पेन्शन, पदोन्नती, आरोग्य विमा, भविष्यनिर्वाह निधी लागू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात मंदा डोंगरदिवे, जयश्री क्षीरसागर, सविता चोपडे, बेबी दाठे, संगीता मादनकर, सुनंदा मोरे, उषा जैवळ, प्रतिभा वक्टे, माया तायडे, सुवर्णा लाटे, अश्विनी सपकाळ, सुनीता पांडव, प्रतिभा आराख यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी व सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात मानधनवाढ समितीच्या शिफारसी मंजूर न झाल्यास जुलै महिन्याचा मासिक अहवाल देण्यावर बहिष्कार तसेच ११ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यभर अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संप पुकारतील, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.