शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका- मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:12 IST

बुलडाणा : गेल्या 26 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांवर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान सर्वांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.

ठळक मुद्देसीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा पुढाकारआंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या 26 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांवर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान सर्वांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.संपकत्र्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दुपारी 12 वाजता सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस स्थानिक स्टेट बँक चौकात जमा झाल्या व त्यांनी हातात लाल झंडे घेत जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्येष्ठ सभासद कुसूम चहाकर, जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. महिलांच्या जोरदार घोषणांनी स्टेट बँक परिसर दणाणून गेला होता. सुमारे अर्धा तास घोषणाबाजी केल्यानंतर अंगणवाडी महिला-सेविकांनी मुख्य मार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी वाहतुकीला बराच अडथळा निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलक महिलांना अटक करून त्यांना विविध गाड्यांमध्ये भरून पोलिस मुख्यालयाच्या आवारात आणले. या ठिकाणीही महिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. या वेळी पत्रकारांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनवाढीसंदर्भात सरकारने गठित केलेल्या समितीने सेविकांना 10 हजार व मदतनिसांना सात हजार रुपये मानधन लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने हे आश्वासन पाळल्याने कृती समितीने संपाची हाक दिली होती. गेल्या 26 दिवसांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. मात्र तरीही सरकारला जाग येत नसल्यामुळेच आजचे हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात पंजाबराव गायकवाड, कुसूम चहाकर,  सचिव सरला मिश्रा, कोषाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, उपाध्यक्ष मंदा डोंगरदिवे, सहसचिव माया वाघ, बेबी दाते, गोदावरी जाधव, सुवर्णा लाटे, प्रतिभा वक्ते, सुवर्णा पाटील, वर्षा शिंगणे, पुष्पलता खरात, पुंजाबाई चोपडे, अश्विनी सपकाळ, सुलोचना पाटील,   सविता चोपडे, संगीता मादनकर, विजया राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.     शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.