शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

२ हजारांवर अंगणवाड्यांना पोषण आहाराची प्रतीक्षा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:05 IST

बुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या  अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू  आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण  आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार  ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये  पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.  सध्या जिल्ह्यातील २0 टक्केच अंगणवाड्यांमध्ये पोषण  आहार शिजत असल्याने अद्याप २ हजार १६२  अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराची प्रतीक्षा  आहे. 

ठळक मुद्देसंप काळात आहार सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नअवघ्या ५७२ अंगणवाड्यात पोषण आहार 

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या  अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू  आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण  आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार  ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये  पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.  सध्या जिल्ह्यातील २0 टक्केच अंगणवाड्यांमध्ये पोषण  आहार शिजत असल्याने अद्याप २ हजार १६२  अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराची प्रतीक्षा  आहे. अंगणवाडी केंद्राचे मानधन, कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा,  सेवानवृत्ती यासह विविध कारणांमुळे राज्यातील अंगणवाडी  केंद्राच्या सेविका व मदतनीस यांनी संप पुकारला आहे.  यामध्ये जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनीस  यांचा सहभाग आहे. या संपामुळे सहा वर्षांंपर्यंंतची बालके,  गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आहार  पोषण व आरोग्यसेवा विषयीच्या विविध सेवांच्या  अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे; परंतु केंद्र  शासनाच्या धोरणानुसार कुठल्याच परिस्थितीत  अंगणवाडी  केंद्रातील बालकांचा पोषण आहार बंद ठेवता येत नाही.  त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार विनाखंडित सुरू  ठेवण्यासाठी बालकल्याण विभागाकडून तात्पुरती व्यवस्था  करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील २५४  अंगणवाड्यांपैकी २२ अंगणवाड्यांमध्ये बचत गटामार्फत  पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच  ग्रामीण भागातील २ हजार ५१0 अंगणवाड्यांपैकी ५५0  अंगणवाड्यांमध्ये आशा वर्कर, महिला बचत गट, शालेय  पोषण आहार आदींच्या माध्यमातून पोषण आहाराची व्यवस् था करण्यात आली आहे. अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील एकूण २ हजार ७६४  अंगणवाड्यांपैकी ५७२ अंगणवाड्यांमध्ये महिला व  बालविकास विभागाने शासनाच्या इतर विभागातील नागरी व  ग्रामीण स्थानिक कर्मचार्‍यांच्या साहाय्याने पोषण आहार  विनाखंड सुरळीत चालू केला आहे; मात्र अद्यापही ८0 टक्के  अंगणवाड्यांमधील पोषण आहार सुरळीत चालू झाला नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार १६२ अंगणवाड्यांमधील  हजारो बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत  आहे. 

आजपासून १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये होणार आहार सुरूजिल्ह्यातील शहरी भागातील २५४ अंगणवाड्यांपैकी २२  अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था  करण्यात आली आहे; मात्र सोमवारपासून १00 टक्के  अंगणवाड्यांमध्ये आहार विनाखंडित सुरू करण्यात येणार  आहे, तसेच ग्रामीण भागातील सर्व अंगणवाड्यांमध्येसुद्धा  दोन दिवसांत बचत गट, आशा वर्करच्या माध्यमातून  आहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

आहार पुरवठय़ासाठी यांचा घेतला जातो सहभागअंगणवाडी सेविका व मदनीस यांच्या संप काळात  अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार सुरळीत राहावा, यासाठी  आशा कर्मचारी किंवा महिला बचत गटावर आहार वाटपाची  जबाबदारी देण्याचे आदेश आहेत; मात्र आशा कर्मचारी  किंवा महिला बचत गटांकडून आहार पुरवठा उपलब्ध होत  नसल्यास त्या कार्यक्षेत्रातील इतर महिला बचत गट,  माध्यमिक शाळेतील मध्यान्ह भोजन पुरविणारी संस्था,  आश्रमशाळेतील भोजन पुरवठा करणारी संस्था किंवा स् थानिक आहार पुरवठादाराची तात्पुरत्या स्वरूपात आहार  देण्यासाठी ग्राम समिती पुरवठादाराची निवड करून त्यांचा  सहभाग आहार वाटपासाठी घेतला जातो. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संप काळात  अंगणवाडी केंद्रावर आहार सुरळीत ठेवण्यासाठी महिला व  बालविकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.  जिल्ह्यातील १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये सोमवारपासून  आहार सुरळीत करण्यात येईल. - सी.बी. चेके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,बालविकास, बुलडाणा.