बुलडाणा : तालुक्यातील कोलवड येथील पैनगंगा व वरखडी संगमावर असलेले जागृत हेमाडपंथी शिवशंकराचे मंदिर परिसरातील भाविक भक्तांचे ङ्म्रध्दास्थान आहे. पैनगंगा व वरखडी नद्यांच्या संगमावर शिवशंकराचे हेमाडपंथी जागृत मंदिर दगडाच्या चिर्यामध्ये बांधले होते, अशी माहिती मिळते. हे मंदिर जिर्ण झाल्यामुळे कोलवड ग्रामस्थ व सागवन येथील माधवआप्पा यांनी मंदिराचा जिर्णोध्दार करण्याचा निर्णय घेतला होता. हेमाडपंथी मंदिर असतांना मंदिरातील पिंड खोलवर होती. परंतु जिर्णोध्दार करतांना ग्रामस्थांच्या विचार विनिमयानंतर शंकराची पिंड वर घेण्यात आली. तर मंदिराच्या जुन्या दगडाचा उपयोग पायाभरणीमध्ये करून षटकोनी सिमेंटच्या विटात मंदिराचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सहाकार्य केले. त्यानंतर भाविक भक्तांच्या सुविधेसाठी मंदिर परिसरात सभामंडप बांधण्यात आला. या मंदिराची स्थापना कोणी केली याबाबत माहिती मिळत नसली तरी मंदिर परिसरात मोठे पिंपळाचे जुने झाड व मंदिरासमोर दिपमाळ होती, असे वृध्दमंडळी सांगतात. कालांतराने दिपमाळ पाडण्यात आल्याने त्याठिकाणी गणपतीची मुर्ती आढळली. यावेळी सागवनचे बसू आप्पा यांनी मोठय़ा भक्तीभावाने या गणपतीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिर बांधून दिले. वतनदार पहाडसिंग पाटील व म्हातारजी पाटील यांनी मंदिरावर जाणार्या रस्त्यासाठी जागा दिल्याने रस्ता तयार करण्यात आला. मंदिर परिसरातील सोयी सुविधेमुळे काही भाविक भक्त आपल्या मुलामुलींचे लग्न या ठिकाणी लावतात. तर ङ्म्रावण महिन्यानिमित्त भंडार्याचे आयोजनही या ठिकाणी नियमित करण्यात येते. याठिकाणी भाविक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून शिवमंदिर ट्रस्ट प्रयत्न करीत असल्याचे साखरे महाराज व रामराव पाटील बाबा यांनी सांगितले.
पैनगंगेच्या तिरावर वसलेले पुरातन शिव मंदिर
By admin | Updated: August 18, 2014 00:16 IST