शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या तेरवीच्या खर्चासाठी तरी पैसे द्या!

By admin | Updated: June 13, 2016 01:47 IST

दिवंगत पतीच्या सेवापुस्तकासाठी महिलेची फरपट : जि. प. प्रशासनाचे दुर्लक्ष.

चिखली : शिक्षक पतीच्या निधनानंतर भविष्य निर्वाह निधी, सेवा नवृत्तीवेतन व सेवा पुस्तकाबाबत वारंवार जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील निराधार महिला तीन वर्षांंपासून जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण करूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने या महिलेला मिळणार्‍या सर्व लाभांपासून वंचित राहावे लागत असल्याने, किमान मृत्यूनंतर तेरवीच्या खर्चासाठी तरी पैसे द्या, अशी अगतिकता तिच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. देऊळगाव घुबे येथील व्दारकाबाई सोनाजी पाटील यांचे पती सोनाजी गजेबा पाटील हे देऊळगाव घुबे येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर २७ सप्टेंबर १९५५ पासून कार्यरत होते. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर भविष्य निर्वाह निधी, सेवा नवृत्तीवेतन व सेवा पुस्तकाबाबतचे सर्व लाभ त्यांची पत्नी द्वारकाबाई यांना मिळणे आवश्यक असताना हे प्रकरण जिल्हा परिषदेत तब्बल तीन वर्षांंपासून धूळ खात पडून आहे. द्वारकाबाई पाटील यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याने त्यांनी आपल्या लेकीकडे आङ्म्रय घेतला आहे. त्यांचे जावई शेषराव लोखंडे यांच्या मदतीने द्वारकाबाईंनी जिल्हा परिषदेकडे १९ व २६ ऑक्टोबर २0१५ आणि ३ जानेवारी २0१६ या तारखेला निवेदन देऊन त्यांचा हक्क मागितला असताना एका महिन्यात तुमचे प्रकरण निकाली काढू, असे आश्‍वासन उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना दिले होते. त्यापश्‍चातही बराच कालावधी उलटूनदेखील कारवाई न झाल्याने अखेर हतबल ठरलेल्या द्वारकाबाईंनी गत महिन्यात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनासमोर उपोषण केले होते. यावेळी शिक्षणाधिकार्‍यांनी याबाबतचा संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी प्रकरण गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा यांना पाठविले आहे. या पश्‍चातही तब्बल महिनाभराचा कलावधी उलटूनही प्रकरण लांबणी पडल्याने या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या वृद्ध द्वारकाबाई पाटील यांनी ह्यमाझ्या तेरवीचा खर्चाला तरी पैसे द्याह्ण अशी अगतिकता व्यक्त केली आहे