शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबरोबरच डेंग्यूचाही धोका वाढला, जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:03 IST

 १ जानेवारी ते ५ ऑक्टाेबर दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा:  जिल्ह्यात कोरोनाबरोबरच डेंग्यूचोही धोका वाढला आहे.  १ जानेवारी ते ५ ऑक्टाेबर दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले आहे. तसेच १८६ डेंग्यू सदृश्य रुग्ण असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. लोणार तालुक्यात सर्वाधिक ९ रुग्ण आढळले आहेत तर मलेरीयाचे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळल्याचे चित्र आहे.   जिल्हा हिवताप विभागाने राबविलेल्या नियोजबद्ध मोहिमेमुळे डेंग्यू रुग्णांची संख्या नियंत्रणात राहील्याचे चित्र आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात तातडीने सर्वे करण्यात येत आहेत.  जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासोबतच डेंग्यूचेही रुग्ण वाढले होते. मात्र, जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने राबवलेल्या मोहिमेमुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. सध्या जिल्ह्यात १ जानेवारी ते ५ आॅक्टोबर  बुलडाणा आणि चिखली तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. जळगाव जामोद तालुक्यात दोन तर संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातील दोन, मोताळा तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे. डेग्युमुळे   एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. लोणारमधील  देउळगाव कुंडपाळ येथे चार, वडगाव तेजन २, भुमराळा १ आणि बिबी येथे दोन रुग्ण आढळले आहेत. मलेरीयाचे जिल्ह्यात तीन रुग्ण असून यामध्ये   जामोद तालुक्यातील खेर्डा बु, बुलडाणा तालुक्यातील केसापूर आणि चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

हत्तीरोगाचे २८ रुग्ण जिल्ह्यात हत्तीरोगाचे २८ रुग्ण आढळले आहे. बुलडाणा शहरात एक,दुधा येथील एक,  मनसगाव, आळसणा, डोलारखेड येथील प्रत्येकी एक,   पिंपळगाव राजा व खामगाव येथील एक आणि सुटाळा बु येथील पाच , टुनकी ,सोनाळा, संग्रामपूर, पळशी येथील प्रत्येकी एक, पिंप्री गवळी येथील एक,  दसरखेड व वरखेड येथील प्रत्येकी एक, मलकापूर येथील येथील दोन, मेहकर, जानेफळ, डोणगाव व वरखंड येथील प्रत्येकी एक आणि  गुंधा,गुंजखेड, अंजनी खुर्द येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 

आठड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच प्रत्येक रविवार आपल्या कुटुंब आणि घरासाठी द्या. या दिवशी घर व परिसरातील डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करून डेंग्यूपासून बचाव करा. - शिवराज चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू