शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक घटकांचे वाटप

By admin | Updated: July 12, 2017 19:22 IST

सामुहिक शेततळे, पेरू घन लागवड, प्लास्टीक आच्छादन व फिरते प्रक्रिया युनीटचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा- जिल्ह्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक घटकांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सामुहिक शेततळे, पेरू घन लागवड, प्लास्टीक आच्छादन, फिरते प्रक्रिया युनिट आदी घटकांचा समावेश आहे.शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जावून तेथून अर्ज भरण्यास मदत मिळवावी. इच्छूक शेतकरी बांधवांनी अर्ज केल्यानंतर उपविभागीय कृषि अधिकारी हे प्राप्त अर्जांमधून लॉटरी पद्धतीने तालुका निहाय शेतकऱ्यांनी निवड करतील व निवड केलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय पूर्वसंमती देईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवांनी 7/12 उतारा, नमुना 8-अ उतारा, आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, एक फोटो व मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे सोबत आवश्यक आहेत. इच्छूक लाभार्थ्यांनी आपल्या गावातील कृषि सहायक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.