शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

देऊळगाव राजा : एकीकडे कोरोनाचे संकट असताना त्यातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ ...

देऊळगाव राजा : एकीकडे कोरोनाचे संकट असताना त्यातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली असून याचा फटका प्रत्येकाला बसत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशा संकटाच्या काळात त्यास आर्थिक हातभार लावणे गरजेचे असताना अद्यापही बँकेने पीक कर्ज वाटपास सुरुवात केली नाही. त्यामुळे त्वरित पीक कर्ज वाटपास सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकरीवर्गाला कोरोनाव्यतिरिक्त अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामात व शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च निघणेही अवघड झालेले आहे. यातच केंद्र शासनाने खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. तथापि, कोरोना महामारीच्या संकटाविषयीचा प्रश्न समोर करून अद्यापपर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सुरुवात केली नाही. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहायला नको, तसेच अनेक शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबत फोनवर विचारणा करीत आहे. मात्र, त्यांना बँकेचे अधिकारी काहीच उत्तर देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सर्व बँक शाखेला आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात, तसेच गावनिहाय शेतकऱ्यांना बँकेत बोलावून अथवा गावनिहाय कॅम्पचे आयोजन करून त्वरित पीक कर्ज वाटपसंबंधीच्या प्रक्रियेस सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते आकाश जाधव यांनी केली आहे.