शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे होणार ‘ऑडिट’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:26 IST

बुलडाणा : जिल्हय़ातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे ऑडिट  करून त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश  अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी गुरुवारी दिले.  जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार  झाल्याची तक्रार माजी मंत्री सुबोध सावजी व बुलडाणा जिल्हा  शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या  सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीवर  आयुक्तांनी हा आदेश दिला. 

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचा आदेश बुलडाणा जिल्हय़ात पाठविणार समिती

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हय़ातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे ऑडिट  करून त्यामध्ये दोषी आढळणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश  अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी गुरुवारी दिले.  जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार  झाल्याची तक्रार माजी मंत्री सुबोध सावजी व बुलडाणा जिल्हा  शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या  सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्या तक्रारीवर  आयुक्तांनी हा आदेश दिला. सुबोध सावजी यांनी पाणी पुरवठा योजनांमध्ये कशाप्रकारे  भ्रष्टाचार झाला, याची माहिती विभागीय आयुक्तांना दिली.  बुलडाणा जिल्ह्यात पावसाळ्यात ७0 टक्के नळ योजना बंद आहे.  काही ठिकाणी महिन्यातून एक किंवा दोन वेळा तेही अशुद्ध पाणी  मिळते. जिल्ह्यातील शासकीय नळ पाणी पुरवठा योजनेतील दोन  हजार कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी गुप्तचर विभागामार्फत व  जिल्ह्याबाहेरील अभियांत्रिकी अभियंत्याच्या समितीमार्फत  करून एफआयआर दाखल करावे, जिल्ह्यात तातडीने सर्वच  गावात दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था करण्यात  यावी, शासकीय नळ योजनेच्या भ्रष्टाचारात प्रामुख्याने  विहिरींकरिता संपादन केलेल्या ७0 टक्के जागांचे रजिस्टर दानपत्र  नाही, नळ योजनेचे काम सुरू करताना ७0 टक्के योजनांमध्ये  विहिरीला पाणी नसतानाच भ्रष्टाचाराकरिता इतर कामे सुरू  केल्याची तक्रार समितीने यावेळी केली. मेहकर तालुक्यातील डोणगाव, आरेगाव, जवळा, हिवरा, रत्ना पूर, नागापूर, शेलगाव देशमुख, मारोती पेठ, बुटी, पार्डी,  सोनाटी, बोरी, दृगबोरी, लव्हाळा, बोथा, वरवंड, बाभूळखेड,  कोयाळी सास्ते, मोहदारी, सावंगी विहीर, सावंगी माळी, सुभाण पूर, वर्दडी, कळपविहीर, वडगाव माळी या गावांमध्ये तसेच  बुलडाणा तालुक्यातील गोंधनखेड, पिंपळखेड, रायपूर, पिं पळगाव सराई, डोंगरखंडाळा, चिखली तालुक्यातील मेरा बु.,  किन्होळा, कवठळ, करवंड, खामगाव तालुक्यातील सोटाळा  खु. जळका तेल्ही, शेगाव - लासुरा खु., आळसना, तरोडा डी,  पारसूळ, जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे,  बोराळा बु., नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी आदी १४0  गावांमधील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची तपासणी करा,  ज्याप्रमाणे स्वच्छतेकरिता गुड मॉर्निंग पथके नेमली, तशीच पाणी  पुरवठा पाहणी पथके नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  विभागीय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीला समितीचे अध्यक्ष  सुबोध सावजी, उपाध्यक्ष वा.रा. पिसे, प्रमोद पाटील, सचिव  संजय ठाकरे, संपर्क सचिव शैलेश सावजी, सहसचिव लता  भोंडे, सदस्य आशिष देशमुख, लता घाईत, पांडुरंग ताडे यांची उ पस्थिती होती.