शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

सर्वच जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. १ जूनपासून ...

बुलडाणा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. १ जूनपासून सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. माॅल आणि शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये असलेली दुकाने मात्र १५ जूनपर्यंत बंदच राहणार आहेत.

राज्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत आहे. त्यामुळे, राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गंत निर्बंध कायम ठेवले हाेते. तसेच गत आठवड्यातील पाॅझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याची मुभा दिली हाेती. बुलडाणा जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट सरासरी ७.२३ टक्क्यावर पाेहोचल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत.

सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने (अंडी, चिकन, मांस, स्वीट मार्ट) आता साेमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत, तर शनिवार आणि रविवारी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया, उद्याेग गृहे, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने साेमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ३ आणि शनिवार, रविवारी सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या दुकानांवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. बॅंका व आर्थिक व्यवहाराशी संबंधीत संस्था सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू राहणार आहेत. बॅंकांनी पीक कर्जाची कामे प्राधान्याने करावीत, तसेच एटीएममध्ये २४ तास राेख ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. शहरातील पेटाेल पंप सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पेटाेल पंप नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. मद्य विक्रीची दुकाने बंदच राहणार आहेत. केवळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपाेच सेवा सुरू राहणार आहे. सर्व वकिलांची कार्यालये, चार्टर्ड अकाैंटंट यांची कार्यालये सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, तर ऑप्टीकलची दुकाने सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

हे बंदच राहणार...

सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, माेकळ्या जागा, उद्याने, बगीचे पूर्णत: बंद राहतील.

माॅर्निग व इव्हिनिंग वाॅक बंदच राहणार आहे.

केशकर्तनालये, सलून, ब्युटी पार्लर बंदच राहणार आहेत.

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत.

सर्व प्रकारचे स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हाॅल बंद राहतील.

चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद राहतील.

जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.

हे राहणार सुरू...

सर्व प्रकारची जीवनाश्यक वस्तूंची दुकाने/किराणा/स्वस्त धान्य दुकाने.

भाजीपाला, फळ विक्रीची दुकाने.

दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री डेअरी.

सर्व प्रकारच्या खाद्याची दुकाने.

कृषी सेवा केंद्र, शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने.

राष्टीयीकृत बॅंका, आर्थिक व्यवहारासंबंधीत संस्था.

पाळीव प्राणी खाद्यपदार्थांची दुकाने.

माॅल आणि शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये नसलेली सर्व प्रकारची दुकाने.

कृषी उत्पन्न बाजार समिती.

विवाह साेहळ्यासाठी २५ लाेकांची उपस्थिती.

विवाह साेहळ्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. केवळ २५ लाेकांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून दाेन तासात विवाह पार पाडावा लागणार आहे.

वृत्तपत्र वितरण सुरूच राहणार

सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहणार आहे. वृत्तपत्रांची घरपाेच सेवा नियमित वेळेनुसार करता येणार आहे. तसेच प्रसारमाध्यमाशी संबंधीत व्यक्ती/पत्रकार तसेच प्रसारमाध्यमांची कार्यालये, सर्व प्रकारची दैनिके, नियतकालिके तसेच टीव्ही न्यूज चॅनल सुरू राहणार आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना प्रवेश बंद...

जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांसाठी प्रवेश पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. निवेदने अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कार्यालये टक्के, तर इतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत.