शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन विभागातील सर्व कर्मचारी गायब

By admin | Updated: May 22, 2017 19:35 IST

खामगाव : येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील सर्वच्या सर्व कर्मचारी एकाचवेळी गायब झाल्याचे गंभीर चित्र सोमवारी दुपारी ४.३० ते ५ वाजेदरम्यान दिसून आले.

नितीन निमकर्डेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागातील सर्वच्या सर्व कर्मचारी एकाचवेळी गायब झाल्याचे गंभीर चित्र सोमवारी दुपारी ४.३० ते ५ वाजेदरम्यान दिसून आले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एन.एच.बोहरा हे सोमवारी अकोला येथे बैठकीसाठी गेले होते. त्यामुळे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर होती. परंतु दुपारी ४.४० च्या सुमारास प्रस्तूत प्रतिनिधीने या विभागास भेट दिली असता कार्यालयात चक्क शुकशुकाट दिसून आला. सर्व खुर्च्या व टेबल रिकामेच होते. थोडावेळ वाट पाहूनही कोणीच न आल्याने यासंदर्भात माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांचे दालन गाठले असता तेही बंद होते. अतिरिक्त गटविकास अधिकारी काळपांडे हे सुध्दा सुटीवर होते. गटविकास अधिकारी शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ह्यनो रिप्लायह्ण आला. तर काळपांडे यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगितले. पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बोहरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण महत्वपूर्ण बैठकीसाठी अकोल्याला आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी दौऱ्यावर किंवा सुटीवर गेल्यानंतर कर्मचारी कार्यालय वाऱ्यावर सोडून जात असून त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याचे दिसून येत आहे.दोन्ही बीडीओंसह विभागप्रमुख गैरहजरखामगाव पंचायत समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती असून कामाचे स्वरुप व विस्तार पाहता या ठिकाणी दोन गटविकास अधिकारी देण्यात आलेले आहेत. गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्यासह अतिरिक्त गटविकास अधिकारी म्हणून काळपांडे सुध्दा कार्यरत आहेत. परंतु प्रस्तूत वेळी दोन्ही अधिकारी तसेच पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ.बोहरा हे गैरहजर होते. त्यामुळे कामानिमित्त ग्रामिण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.अकोला येथे महत्वपूर्ण बैठक असल्याने मी दौऱ्यावर आहे. कार्यालयात कोणी हजर नसल्याचे आपणास माहित नाही. कार्यालयातील कर्मचारी चहा वगैरे पिण्यासाठी बाहेर गेले असावेत. यासंदर्भात माहिती घेवून योग्य ती कार्यवाही करु.- डॉ.एन.एच.बोहरापशुसंवर्धन अधिकारी, पंचायत समिती, खामगाव