शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर ‘गण गण गणांत बोते’चा गजर

By admin | Updated: February 19, 2017 02:15 IST

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद : ‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दी

बुलडाणा, दि. १८- श्रींच्या प्रकट दिनानिमित्त १८ फेब्रुवारी रोजी जिल्हाभर ह्यगण गण गणांत बोतेह्णचा गजर गुंजला. गावागावांत भजन, कीर्तन व भागवताचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्रीक्षेत्र येळगाव येथे प्रगटदिनी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची एकच गर्दी उसळली. मंदिरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रकट दिन उत्सवाची ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शनिवारी पहाटे पाच वाजता ह्यश्रींह्णची विधिवत महापूजा करण्यात आली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गजानन विजय ग्रंथ पारायणाची कळस अध्यायाने सांगता झाली. सकाळी १0 वाजता वारकरी महामंडळाचे राज्याध्यक्ष हभप प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली. बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी एक वाजेपासून रात्री उशिरापर्यंंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रींच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गुरुदेव बहूद्देशीय संस्था, ग्रामपंचायत व डॉक्टर्स मित्र परिवाराच्यावतीने भाविकांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात आले. हृदयरोग, मेंदूरोग, सांधेदुखी, मधूमेह, रक्तदाब, हर्निया, मोतीबिंदू, काचबिंदू व अन्य रोगाची तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. सुनील राजपूत, डॉ. विजय निकाळजे, डॉ. डुकरे, डॉ. खोलाडे, डॉ. कल्याणी राजपूत, डॉ. प्रियंका गायकवाड यांनी सेवा देत ५५0 रुग्णांची तपासणी केली.