शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अलमपूर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप!

By admin | Updated: April 15, 2016 02:11 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ग्रामपंचायत, जि. प. शाळा, बुद्ध विहारात अभिवादन.

नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अलमपूर येथे १८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे. २५ वर्षांंपासून होणार्‍या विरोधाच्या पृष्ठभूमीवर निघणार्‍या या मिरवणुकीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व नागार्जुन बुद्ध विहारात भारतरत्न बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी गावातून मिरवणुकीची परवानगी नसल्याने चार हजार लोकसंख्येचे अलमपूर हे गाव चर्चेत आले होते. पोलिसांनी यावर्षी १८ एप्रिल रोजी मिरवणुकीची परवानगी दिल्यानंतर गावात मागील दहा दिवसांपासून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानात मंडप टाकून जयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.