शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा-बुलडाणा राज्य मार्ग कामात गैरव्यवहार!

By admin | Updated: February 16, 2016 01:10 IST

लोकायुक्तांच्या निर्देशावरून पाच व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल; ५९ लाखांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार.

बुलडाणा: मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या आणि जिल्ह्यातून जाणार्‍या अजिंठा-बुलडाणा राज्य मार्गाच्या कामात ५९ लाखांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत बुलडाण्यातील पत्रकार स्व. पी.पी. कोठारी यांनी केलेल्या तक्रारीवरून लोकायुक्तांच्या निर्देशानुसार या प्रकरणात संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. अजिंठा- बुलडाणा रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबत पत्रकार स्व. पी.पी. कोठारी यांनी लोकायुक्तांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीत नमूद केले होते की, अजिंठा-बुलडाणा राज्य महामार्गाच्या कामात ठेकेदार रेणुका कन्स्ट्रक्शनने जे डांबर आणले, त्याचे बनावट गेटपास शासनास सादर केले. त्यानंतर दक्षता व गुणनियंत्रण विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत ते पासेस कंपनीने दिले नसल्याचे सांगितले. यावरून शासनाकडे बनावट पास सादर करण्यात आल्याचे सिद्ध झाले. सदर कामात कंत्राटदार व संबंधित अधिकार्‍यांनी संगनमत करून शासनाची एकूण ५९ लाख १५ हजार ८३८ रुपयांची फसवणूक केली. त्यात डांबर प्रकरणात शासनाची ३६ लाख ३३ हजार ४३४ रुपयांची, तर ओव्हरसाईज खडी वापरून २२ लाख ८२ हजार ४0४ रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या रस्त्याच्या कामाविषयी तक्रार केल्याची माहिती असतानाही विभागीय लेखाधिकारी यांनी ही बाब संबंधितांच्या नजरेस आणून न देता, बिले मंजुरीसाठी सादर केली. कार्यकारी अभियंत्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करून मोठय़ा आकाराच्या खडी टाकल्यानंतरही कंत्राटदाराचे बिल मंजूर केले. यामध्ये रेणुका कन्स्ट्रक्शन (अजिंठा), शाखा अभियंता बी.बी. नेवारे, उपअभियंता जी.बी. पोहेकर, विभागीय लेखाधिकारी एच.डी. लांजेवार, कार्यकारी अभियंता एम.बी. मोरे हे दोषी आढळले असून, त्यांच्याविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.