शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोगस तणनाशक फवारणीने कृषी विभागात गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:41 IST

कृषी मंत्री खोत यांनी बोगस तणनाशक प्रकरणी जिल्ह्यातील तीन कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतू या कारवाईने आता, कृषी विभागाच्या वुर्तळात गोंधळ उडाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: तणनाशक फवारणीमुळे पिके करपल्याच्या घटना जिल्ह्यात गत आठवड्यामध्ये समोर आल्या. दरम्यान, कृषी मंत्री खोत यांनी बोगस तणनाशक प्रकरणी जिल्ह्यातील तीन कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई केली. परंतू या कारवाईने आता, कृषी विभागाच्या वुर्तळात गोंधळ उडाला आहे. कृषी केंद्र चालक या कारवाईच्या विरोधात गेले असून तणनाशक औषधांच्या कंपन्या सोडून विक्रेत्यांवर कारवाई कशी? असा मुद्दा यामुळे उपस्थित झाला आहे.पिकांमधील तण नष्ट करण्यासाठी शेतकरी तणनाशक औषधांची फवारणी करत आहेत. तर पिकांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी टॉनिक व किटकांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीड नाशकांचा फवारा सध्या पिकांवर मारल्या जात आहे. परंतू या औषधांच्या फवारणीचा विपरीत परिणाम झाल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला. मेहकर तालुक्यातील कळपविहिर याठिकाणी १६ एकरातील सोयाबीन तर लोणार तालुक्यातील शारा शेतशिवारातील १५ एकर शेतातील सोयाबीन पीक तणनाशक फवारणीमुळे जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचबरोबर चिखली तालुक्यातही एका ठिकाणी तणनाशक फवारणीमुळे सोयाबीन पिक करपल्याचा प्रकार गत आठवड्यामध्ये समोर आला. कृषी विभागाने या सर्व ठिकाणी पाहणी केली. दरम्यान, कृषी व फलोत्पादन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १८ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील त्या कृषी केंद्र चालकांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हा कृषी अधिक्षकांनी तीन कृषी केंद्र संचालकांचे परवाने निलंबित केले. तसेच बोगस बियाणे, किटकनाशके यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कारवाई करून संबंधित कृषि केंद्राचा परवाना निलंबित करावा, अशा सुचनाही दिल्या होत्या. त्यामुळे कृषी केंद्र चालक हे केवळ औषध विक्रीचे काम करतात, औषध निर्मितीचे काम कंपनी करते, तेंव्हा कंपनीवर कारवाई करण्याऐवजी विके्रत्यांवर कारवाई होत असल्याने कृषी केंद्र चालकांमधून रोष व्यक्त होत आहे.

कृषी केंद्र चालक आंदोलनाचा पावित्र्यातकृषी केंद्र चालक हे नियमित शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासह त्यांची मदत करता. एखाद्या कंपनीचे तणनाशक, किटकनाशकाबाबत तक्रार असल्यास शेतकºयांनी कृषी केंद्र चालकांना साक्षीदार बनवून कंपन्यांच्या विरोधात तक्रार द्यावी, कृषी विभागाने कोणतीही चौकशी न करता कृषी केंद्र चालकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करून नये, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा जिल्हाभर कृषी केंद्र बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड. सुनिल देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकक्षांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादन असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हाभरातील कृषी केंद्र चालक उपस्थित होते.

कृषी निविष्टांची गुणत्ता विक्रेत्यास कळणार कशी?कृषी केंद्र चालकांना बियाणे, किटकनाशक, तणनाशक व रासायनिक खते यांचा सिलबंद माल खरेदी व विक्रीचा परवाना मिळतो. ज्या कंपनीला व त्यांच्या उत्पादनास कृषी विभागाला परवानगी दिलेली आहे, त्याच कंपन्याचे साहित्य कृषीकेंद्र परवानाधारक विकतात. त्यामुळे सिलबंद असलेल्या तणनाशक, किटकनाशकाची गुणवत्ता कृषी केंद्र संचालकास कशी कळणार? असा प्रश्न जिल्हा कृषी साहित्य विक्रेता व उत्पादन असोसिएशनचे पदाधिकाºयांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती