शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग ‘इलेक्शन मोड’वर : पीक नुकसानाची पाहणी रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:43 IST

कृषी विभागाचे कर्मचारीही निवडणूक विषयक कामांमध्ये गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. कृषी विभागाचे कर्मचारीही निवडणूक विषयक कामांमध्ये गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या निवडणूक विषयक कामांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारीही निवडणूक विषयक कामांचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष कामांमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे साहाजिकच शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून खामगाव तालुक्यात सातत्याने पाऊस पडला.पावसाचे प्रमाणही प्रचंड असल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली. उडदाचे पीक हातून गेले. त्यापाठोपाठ अनेक शेतांमध्ये सोयाबीन सडले. पहिल्या पेºयातील ज्वारी सध्या काळी पडण्याची भिती आहे. कपाशीच्या कैºया सडल्या असून उत्पादनात घट येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या हेतूने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा सर्व्हे होणे अपेक्षित होते. काही शेतात कृषी विभागाचे कर्मचारीही गेलेही; परंतु या प्रक्रियेला वेग आलेला नाही.परिणामी शेतकºयांचे नुकसान होऊनही त्यांना मदत मिळण्याची आशा धुसर होताना दिसत आहे. खामगाव तालुक्यात विशेष करून पिंपळगाव मंडळामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.पिंपळगावराजा, भालेगाव, ढोरपगाव, काळेगावसह परिसरात मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यात इतरही भागात पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे युद्धपातळीवर करावा व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खामगाव तालुक्यात सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता, नुकसान झालेल्या क्षेत्राची नक्की माहिती देता येणार नाही, असे सांगण्यात आले. तरी सुमारे १००० ते १२०० हेक्टरवर नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये कृषी विभागाचे कर्मचारी गुंतले असले, तरी शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोमवारपासून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतरच प्रत्यक्ष किती क्षेत्रावर नुकसान झाले, याची माहिती देता येईल.-गणेश गिरीतालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती