शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या आत्महत्येनंतर गावकर्‍यांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:19 IST

चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे  तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकर्‍यांनी गावातील  अवैध दारूची दुकाने बंद करण्याकरिता १५ सप्टेंबर रोजी  तीव्र आंदोलन केले. जोपर्यंत दारूची दुकाने व धाबे बंद  करणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार  नसल्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतल्यावर पोलिसांनी दारू  दुकाने बंद करीत पोलीस पाटलाला निलंबित केले. 

ठळक मुद्देदारूबंदीची मागणीमाळशेंबा येथील पोलीस पाटील निलंबित 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे  तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकर्‍यांनी गावातील  अवैध दारूची दुकाने बंद करण्याकरिता १५ सप्टेंबर रोजी  तीव्र आंदोलन केले. जोपर्यंत दारूची दुकाने व धाबे बंद  करणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार  नसल्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतल्यावर पोलिसांनी दारू  दुकाने बंद करीत पोलीस पाटलाला निलंबित केले.  सचिन वामन देशमुख (वय २८) याने राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रायपूर पोलीस  स्टेशनचे पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यासाठी गेले असता  गावकर्‍यांनी व महिलांनी विरोध केला. सदर तरुण युवकाने  दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  याला धाब्यावर अवैध दारू विक्री करणारे जबाबदार आहे.  धाबे चालविणार्‍यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही पंचनामा  करू देणार नाही, असा महिलांनी व गावकर्‍यांनी पवित्रा घे तला होता. दोन दिवसांपूर्वीच याच गावातील महिलांनी  माळशेंबा गावातील अवैध दारू विक्री बंद करावी, याचे  बुलडाणा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. गावा तील वातावरण चिघळत चालल्यामुळे बुलडाणा पोलीस उ पविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी, चिखली तहसीलदार  गायकवाड, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे.एन. सैयद,  चिखली पो.स्टे. ठाणेदार देशमुख, बुलडाणा दंगाकाबू पथक  यांनी माळशेंबा गावाकडे धाव घेऊन तेथील परिस्थिती  जाणून घेतली व या गावच्या परिसरातील सर्व धाब्यांची  तोडफोड करून धाबे बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील  महिला व गावकर्‍यांशी सर्व अधिकार्‍यांनी संवाद साधून मृ तदेह खाली घेऊन पंचनामा केला. माळशेंबा गावाजवळील  सर्व रस्त्यांच्या दुतर्फा असलेली दुकाने बांधकाम विभागाने  तोडून टाकले. पुढील तपास रायपूर ठाणेदार जे.एन. सैयद व  त्यांचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

आ. राहुल बोंद्रे यांची भेटमाळशेंबा येथे दारूच्या नशेत घरामध्ये तरुणाने गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडताच गावकर्‍यांमध्ये  अवैध दारू विक्री करणारांच्या विरोधात आक्रोश निर्माण  झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल  बोंद्रे यांनी घटनास्थळावर जाऊन या घटनेची माहिती जाणून  घेतली व गावातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन  केले. या गावातील सर्व अवैध धंदे बंद केले जाईल, असे  आश्‍वासन आ.राहुल बोंद्रे यांनी महिला मंडळांना दिले.