शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन महिन्यानंतर अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:01 IST

Crop Loan : एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: खरीप हंगामामध्ये बँकांना पीक कर्जापोटी दिलेल्या उदिष्टाच्या अवघे ४४ टक्केच पीक कर्ज वाटप झाले आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. मात्र बँकांनी जिल्ह्यास दिलेल्या एकूण उदिष्टाच्या ५० टक्केही पीक कर्ज वाटप केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच ३१ जुलै पीक कर्ज वाटपाची अखेरची मुदत आहे.त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटपाचा टक्का आता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातच जिल्हयात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास ७ टक्के पावसाची तूट होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या होत्या तर काही भागात पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. आता जिल्हयात जवळपास ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असल्या तरी पीक कर्ज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी उसणार करून पेरणी केली आहे. परिणामी किमानपक्षी शेतकऱ्यांना आता तरी पीक कर्ज वाटपाचा वेग वाढविण्याची गरज आहे.बुलडाणा जिल्ह्याती बँकांना यंदाच्या खरीप १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी २१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ६५ हजार ८०४ शेतकऱ्यांना ५६९ कोटी ५९ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एकूण उदिष्टाच्या ते ४४ टक्के आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १ हजार कोटींनी पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट कमी झाले आहे. त्या उपरही पीक कर्जाचा टक्का वाढलेला नाही. त्यामुळे येत्या काळात बँकांना हा टक्का वाढवावा लागणार आहे. प्रसंगी ३० सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज वाटप केले जाऊ शकते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Loanपीक कर्ज