शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलानंतर आता डाळींचे भावही भिडले गगनाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:09 IST

Market News : सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : सर्वत्र कोरोनाचा हाहाकार असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच आता महागाईनेही डोके वर काढल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. सध्या खाद्यतेलाने चांगलाच भाव खाल्ला असताना डाळींचे दरही कडाडले आहेत. परिणामी अनेकांच्या ताटात वरण नसल्यागत झाले आहे.कोरोनाच्या महामारीत नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढविणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता नियमित सकस आहाराची आवश्यकता आहे. याकरिता रोजच्या जेवणात डाळींचे वरण हा मोठा आधार ठरतो; परंतु आता डाळींच्या दराने शतक पार केल्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. नित्य वापरातील सोयाबीन तेलाचे दर १६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.या भावात सातत्याने वाढ होत असून, यापाठोपाठ डाळींच्या दरांनीही उच्चांक गाठला आहे. अपवाद वगळता सर्व डाळींचे दर शंभरावर असल्याने ही महागडी डाळ सर्वसामान्य वर्गाला विकत घेणे परवडणारी नाही. त्यामुळे सामान्यांच्या नित्य भोजनातील वरण नाहीसे होणार का, अशी चिंता सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने हाताला काम नाही. मजूर वर्ग कमालीचा निराश व चिंतेत आहे. यातच महागाईनेही भर घातल्याने मजूरवर्ग आता दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.  जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरीकांमधून करण्यात येत आहे. का झाली डाळींच्या दरात वाढ? n यावर्षी खरीप हंगामातील पिकांना सततचा पाऊस आणि किडींच्या प्रादुर्भावाने चांगलाच दणका दिला. याचा परिणाम तूर पिकावरही झाला असून, बऱ्याच शेतकऱ्यांची तूर सततच्या पावसाने करपून गेली. काहींना किडीच्या प्रादुर्भावामुळे फारसे उत्पादन होऊ शकले नाही. n हरभरा, मूग आणि उडीद आदी पिकांचीही हीच अवस्था राहिल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. बऱ्याच शेतकयांचा लावलेला खर्चही भरून निघाला नाही. त्यामुळे बाजारात आता डाळीच्या किमती वाढायला लागल्या आहेत.

रोजच्या जेवणात तुरीची डाळ हा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांसह वृद्धांनासुद्धा जेवणात वरण अत्यावश्यक असते. आता डाळीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेटही चांगलेच वाढले आहे. -वंदना करांगळे, गृहिणी

स्वयंपाक घरात नित्य वापरात येणाऱ्या सर्वच वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, मिरची-मसाला यासोबतच डाळींचेही दर वाढल्याने आता या महागाईत जगावे कसे, हा प्रश्न आहे.- प्रमिला मोरे, गृहिणी 

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार