शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कलालवाडी दलित वस्तीला टँकरव्दारे पाणीपूरवठा

By admin | Updated: May 22, 2017 19:21 IST

शिवसंग्रामने दिला होता घागर मोचार्चा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवराजा :  कलालवाडी दलित वस्तीला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. वारंवार पाणी समस्या बाबत ग्रामपंचायत पंचायत समिती वार्षिक आमसभा याठिकाणी पाणी प्रश्नाबाबत तक्रारी करुनही या समस्यांकडे प्रशासन गांभीयार्ने घेत नव्हते. या समस्येचा पाठपुरावा करत कलालवाडी दलित वस्तीला पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा म्हणून लोकशाही मागार्ने शिवसंग्राम संघटनेच्या वतीने घागर मोर्चा काढण्याचा इशारा देताच २० मे पासून टँकरने पुरवठा सुरु करण्यात येत आहे. तसे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांनी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांना दिले.

कलालवाडी दलित वस्तीतिल जनतेला पाण्यासाठी वन-वन फिरावे लगत होते. उन्हाळयात दूर अंतरावरुन डोक्यावर हंडयाने पाणी अनावे लागत होते. येथील पुरुष, महिला रोजनदारीने काम करतात.  पाणी भरण्यातच त्याच्या अर्धा दिवस वाया जात होता. कलालवाडी येथील नागरिकांनी वेळोवेळी ग्राम पंचायत प्रशासनाकड़े मागणी करूनही ग्रामपंचायतने पाण्याचा प्रश्न गांभीयार्नेघेतला नाही. आमसभेत देखील कलालवाडी येथील पाण्याचा प्रश्न खुप गाजला होता. त्यावेळी आमसभा अध्यक्ष आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी कलालवाडी या दलित वस्तित तात्काळ उपाय योजना करुण  पाणी पुरवठा करा असे निर्देश प्रशासनास दिले होते. परंतु प्रशासनाने कोणतीही व्यवस्था केले नाही. शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जाहिर खान पठाण यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यासह कलालवाडी नागरिकांना सोबत घेऊन गटविकास अधिकारी आशीष पवार यांना पंचायत समिती कार्यालयात घेराव घालून कलालवाडी वस्तीत तात्काळ पाणीपुरवठा करा, अन्यथा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने पंचायत समिति कार्यालयावर घागर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर पाणीपूरवठा करण्यात आला.