शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आदिवासी वृद्ध कुटुंबप्रमुखाचाही मृत्यू

By admin | Updated: May 16, 2016 01:24 IST

मालठाणा येथील सामूहिक आत्महत्या प्रकरण; चार दिवसांपासून सुरू होती मृत्यूशी झुंज.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मालठाणा गावातील आदिवासी पावरा समाजातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून ११ मे च्या रात्री सामूहिक विष प्राशन केले होते. यामध्ये या कुटुंबातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर ८0 वर्षीय नानसिंग सित्तु मसाने या कुटुंबप्रमुख वृद्धाला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना उपचाराकरिता अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा अखेर १५ मे रोजी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दुपारी १ वाजेदरम्यान मृत्यू झाला आहे. मालठाणा या आदिवासी गावातील पावरा समाजातील नानसिंग सित्तु मसाने (वय ८0), सून लक्ष्मी भावसिंग मसाने, नातू सुरेश भावसिंग मसाने आणि मुलगा दिनेश नानसिंग मसाने या एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी रात्री ७ वाजेदरम्यान सामूहिक विष प्राशन केले होते. यामध्ये ११ मे च्या रात्री जळगाव जामोद येथील रुग्णालयात दिनेश नानसिंग मसाने (वय ३५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात लक्ष्मी भावसिंग मसाने, आणि सुरेश भावसिंग मसाने या माय-लेकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नानसिंग मसाने या वृद्ध कुटुंब प्रमुखाची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले होते. चार दिवसांपासून नानसिंग सित्तु मसाने यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते ते उपचाराला चांगला प्रतिसादही देत होते त्यांच्या या आत्महत्येच्या प्रयत्नाचे बयाणही जळगाव जामोद पोलिसांनी १२ मे रोजी घेतले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाल्या होत्या. मात्र त्यांना १५ मेच्या दुपारी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी अकोला येथील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे मसाने कुटुंबावर आणखी एक नियतीने आघात केला असून संपूर्ण मालठाणा गावावर या घटनेमुळे दुख:चा डोंगर पसरला आहे.