शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

२२ वर्षांंनंतरही ओझोन दिनाला जागरुकतेचा अभाव

By admin | Updated: September 16, 2016 02:54 IST

आज ओझोन दिन; ओझोनचे प्रमाण घटल्याने ग्लोबल वार्मिंगचा धोका.

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. १५- ओझोन थराचे रक्षण करण्यासाठी व पर्यावरणविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून १९९४ साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत घोषित करण्यात आला होता; परंतु या घोषणेला २२ वर्ष उलटल्यानंतरही ओझोन दिनाला जागरुकतेचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे ओझोन संवर्धन दिनच प्रदूषणाच्या विळख्यात अडकला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागतिक पातळीवर विविध प्रयत्न केले जातात. त्यातीलच एक १६ सप्टेंबर रोजीचा ओझोन संवर्धन दिन आहे. जागतिक ओझोन संवर्धन दिनङ्घहा पर्यावरणाला जतन करण्याची आठवण करून देणारा दिवस म्हटला जातो. सन १९९४ ला युनायटेड नेशन्सच्या सर्वसाधारण सभेत ओझोन थराची वाढती घट लक्षात घेऊन १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून घोषित करण्यात आला. ओझोन थराची घट होण्यामागची कारणे पडताळून पर्यावरण संवर्धनासाठी पाऊले उचलावित, असा त्यामागचा उद्देश होता. ओझोनचा थर पृथ्वीपासून १0 ते ५0 कि.मी. अंतरावर आहे. सर्वसाधारणपणे ओझोन ऑक्सिजनचे रेणू, अणु आणि सूर्यकिरणे यांच्या प्रक्रियेने बनलेला असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओझोनचा थर अतिनिल सूर्यकिरणे म्हणजे (यू.व्ही.बी) शोषून घेतो आणि जमिनीपयर्ंत स्वच्छ सूर्यकिरणे पोहोचविण्यास मदत करतो. जर ही किरणे तशीच अतिनिल रूपात जमिनीवर आलीत तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट आहेत. ज्यामध्ये कर्करोग, मोतीबिंदू, त्वचेचे रोग, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, त्वचेवर सुरकत्या पडणे, सागरी जिवांना धोका, यांचा समावेश आहे. त्याचबरोबर वैश्‍विक तापमानवृद्धी, वनस्पती प्लवकांचा मृत्यू, वातावरण बदल असे अनेक परिणाम होतात. गेल्या काही वर्षात या ओझोनचे प्रमाण घटत चालले आहे. ओझोनचे घटते प्रमाण सजिवांसाठी धोक्याचे ठरत आहे. २२ वर्षानंतरही ओझोन संवर्धनाबाबत जनजागृती पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झाली नसल्याने प्रदूषणाचे प्रमाण वाढतच आहे.