शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या २५0 पाल्यांना घेणार शिक्षणासाठी दत्तक!

By admin | Updated: May 28, 2017 04:25 IST

जनता शिक्षण संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्रात गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हजारो शेतकर्यांनी दुष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तींना तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या १५0 पाल्यांना शिक्षणासाठी सातारा येथील जनता शिक्षण संस्था दत्तक घेणार आहे. संस्थेच्यावतीने पाल्यांना दहावीनंतरचे पूर्ण शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. सदर संस्थेचे सदस्य सध्या पश्चिम वर्हाडात आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांचा शोध घेण्याकरिता आले आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये हजारो शेतकर्यांनी दुष्काळ, गारपीट या नैसर्गिक आपत्तींना तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकार काही प्रमाणात आर्थिक मदत करते. राज्यातील अनेक सामाजिक संघटना यांनीही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदतीचे सामाजिक कार्य केले आहे. या सामाजिक कार्यात आ पणही खारीचा वाटा उचलला पाहिजे, या भावनेतून वाईच्या जनता शिक्षण संस्थेने राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील पाल्यांची शैक्षणिक हेळसांड होऊ नये, त्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून राज्यभरातील सुमारे २५0 मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. सन २0१६-१७ पासून या मुलांना मोफत निवासी शिक्षण देण्यासाठी जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ याबरोबरच, किसन वीर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ, प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलांचे शिक्षण मध्येच थांबू नये, यासाठी त्यांना मोफत निवासी शिक्षण देण्याची संकल्पना संचालक मंडळापुढे मांडली. संचालक मंडळाने तत्काळ मान्यता दिल्याने या सामाजिक कार्याने गती घेतली. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबातील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंना पुढील शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. बारावीनंतर वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतल्यावरही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च जनता शिक्षण संस्था करणार आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या पाल्यांनी संपर्क करण्याचे आवाहन डॉ. डी. बी. आगरेकर यांनी केले आहे.