शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लू रोखण्यास प्रशासन सज्ज

By admin | Updated: February 27, 2015 01:21 IST

बुलडाणा जिल्ह्यात टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा- जिल्हाधिकारी कुरुंदकर.

बुलडाणा : जिल्ह्यात स्वाईन फ्लूने दोन रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली असून, स्वाइन फ्लू आजारावर परिणामकारक ठरणार्‍या टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. जिल्ह्यात सामान्य रुग्णालय बुलडाणा, शासकीय रुग्णालय खामगाव, उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर व शेगाव येथे रुग्णांच्या तपासणीसाठी केंद्र उघडण्यात आले आहे; तसेच बाधित रुग्णांच्या उपचारासाठी याच चार ठिकाणी आयसोलेशन कक्षही स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती नियोजन समितीच्या दालनामध्ये स्वाइन फ्लू आजाराबाबत आयोजित बैठकीत देण्यात आली. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक हिवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. कसबे, शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली ठग व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. तालुका मुख्यालयात काही मेडिकल स्टोअर्समध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीने टॅमी फ्लू गोळ्या ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित करीत जिल्हाधिकारी म्हणाले की, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी यांनी रुग्ण तपासताना मास्क वापरण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना मुलांमध्ये या आजाराची लक्षणे किंवा ताप दिसल्यास त्या मुलाला तातडीने रुग्णालयात दाखविण्याचे पालकांना सांगावे; तसेच त्यांना स्वाइन फ्लूबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. स्वाइन फ्लूला कारणीभूत असणारा विषाणू एच १ एन १ चा प्रसार नियंत्रणात येत असल्याचे सांगितले. सद्यस्थितीत तापमान वाढत असल्यामुळे या विषाणूचा प्रसार नियंत्रणात येणार आहे. संशयीत रुग्णाचे थ्रोट स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवून २४ तासाच्या आत निदान केल्या जात आहे.