शेगाव: कार्यालयाच्या आवारात, दालनासमोर तसेच दर्शनी भागात ठेवलेल्या बेवारस वस्तूंकडे अधिकारी-कर्मचारी, नागरिक बिनदिक्कतपणे पाहतात; पण ही वस्तू कोणाची, इथे का ठेवली, त्यात काय आहे, असे दुर्लक्ष जीवावर बेतेल काय, याचा तसुभरही संशय घेत नाहीत. लोकमत चमूने शुक्रवारी खामगाव बसस्थानक, नांदुरा रेल्वे स्थानक तसेच शेगाव येथे रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि तहसील कार्यालयात टिफीन डबे ठेवले. खूप वेळ ठेवलेल्या या डब्यांकडे पाहण्याशिवाय दुसरी कोणतीही कृती कुणीही केल्याचे आढळले नाही. त्यावरून अधिकारी, कर्मचारी, नागरिकांत जागरूकतेचा अभाव असल्याचे लोकमत स्टिंग ऑपरेशननंतर समोर आले आहे.रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच तहसील कार्यालयात एक टिफीन ठेवण्यात आला होता. शासकीय इमारतीच्या कार्यालयात डबा ओलांडून दुर्लक्ष करीत कर्मचार्यांनी आत प्रवेश केला. तर रेल्वे स्थानक, बस स्थानक या सार्वजनिक ठिकाणी पोलिस प्रशासन, एस. टी. व रेल्वेचे कर्मचारी किंवा कुठल्याही नागरिकाने याबाबत सतर्कता दाखविली नाही. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र .१ व २ वर सर्वप्रथम पोलिस कर्मचार्यांच्या नजरा चुकवून टिफीन-डबा दुपारी ११:0५ वाजण्याच्या सुमारास ठेवला. अनेक अधिकारी-कर्मचारी व प्रवासी या टिफीनकडे पाहत तेथून जात होते; मात्र कोणालाही हा टिफीन दिसला नाही. आरपीएफ आणि जीआरपी पोलिस कर्मचार्यांनी या डब्याच्या जवळुन अनेकवेळा चकरा मारल्या; मात्र या डब्यामध्ये काही संशयास्पद वस्तू असू शकते, याचा विचार कुणीही केला नाही. प्रवाश्यांनीही बेवारस वस्तु पोलिसांच्या लक्षात आणून देण्याचे कर्तव्य पार पाडले नाही.बसस्थानकातील प्रवासी प्लॅटफॉर्मवर टिफीन ठेवले; मात्र बस स्थानकात भरपूर गर्दी अस तंनासुध्दा प्रवासी किंवा कुठल्याही एस. टी. कर्मचार्यांचे लक्ष या बेवारस टिफीनकडे गेले नाही. यावेळी चौकशी कक्षांच्या खिडकी जवळ अर्धा तास डबा पडलेला होता. एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या उपाय योजना राबवित आहे. एस टी बसेस मध्ये ही बेवारस वस्तुबाबत ही दर्शनी भागात फलके लावण्यात आलेली आहे; मात्र बसस्थानकात एवढय़ा मोठय़ा अधिकारी व कर्मचार्यांच्या समक्ष बेवारस डबे बस स्थानकात पडून राहतात व याकडे त्यांचे लक्ष जात नाही. याबाबत आश्चर्यच म्हणावे लागेल.
सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रशासन बेजबाबदार
By admin | Updated: September 28, 2014 00:20 IST